नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने 2022-23 साठी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने रविवार, 26 मार्च रोजी उशिरा रिटेनरशिप यादी जाहीर केली, ज्यामध्ये एकूण 26 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने चार श्रेणी तयार केल्या आहेत. शीर्षस्थानी A+ श्रेणी आहे, ज्यामध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, यातील एक खेळाडू जखमी झाला आहे.
बीसीसीआयने A+, A, B आणि C श्रेणींमध्ये एकूण 26 खेळाडूंची निवड केली आहे. A+ मध्ये 4, A श्रेणीमध्ये 5, B श्रेणीमध्ये 6 आणि C श्रेणीमध्ये 11 खेळाडू आहेत. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात आला आहे, ज्यामध्ये पहिल्या श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये, A श्रेणीच्या खेळाडूंना 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी आणि C श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतील.
SA vs WI: T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने केला सर्वाधिक धावांचा पाठलाग, 259 धावा करून सामना जिंकला
BCCI च्या A+ श्रेणीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना A श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. तर चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना B गटात संधी मिळाली आहे.
तसेच C श्रेणीत उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत यांचा समावेश आहे.