BCCI Big Announcement : भारतीय क्रिकेट (Cricket) नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा (Jai Shah) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज मोठी घोषणा केली. देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांच्या बक्षीसच्या रकमेत वाढ करत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
I’m pleased to announce an increase in prize money for all @BCCI Domestic Tournaments. We will continue our efforts to invest in Domestic Cricket – which is the backbone of Indian Cricket. Ranji winners to get ₹5 crores (from 2 cr), Sr Women winners ₹50 lacs (from 6 lacs)🇮🇳 pic.twitter.com/Cgpw47z98q
— Jay Shah (@JayShah) April 16, 2023
जय शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, देशामध्ये खेळल्या जाणार्या क्रिकेट स्पर्धेतील बक्षीस रकमेमध्ये वाढ करण्याचे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. भारतीय क्रिकेटचा कणा असलेल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवत आहोत.
रणजी विजेत्यांना या पुढे ५ कोटी रुपांचे बक्षीस दिले जमार्फ आहे. याअगोदरही ही रक्कम २ कोटी होती. तर वरिष्ठ महिला विजेत्यांना ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असलायची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. याअगोदर ही रक्कम केवळ ६ लाख रुपये इतकी होती. (BCCI)
तसेच ‘खेळाडूंना किमान 50 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी असं बीसीसीआयच्या बहुतेक सदस्यांचं मत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) घेणार होते. बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.