सध्या टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. (India) त्यानंतर उभयसंघात 9 डिसेंबरपासून टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच उपकर्णधार शुबमन गिल याचं मानेच्या दुखापतीनंतर भारतीय संघात कमबॅक झालं आहे.
बीसीसीआयने 3 डिसेंबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान टी 20i सीरिजसाठी सूर्यासेनेची घोषणा केली. त्याआधी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. यंदा भारतात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. टी 20i मालिकेतील 5 सामने हे 9 ते 19 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.
भारताने वनडेमध्ये सलग 20 व्यांदा गमावलं टॉस; आज मालिका जिंकणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन
या मालिकेसाठी टीममध्ये मॅचविनर आणि अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं 2 महिन्यानंतर कमबॅक झालं आहे. हार्दिकला टी 20i आशिया कप स्पर्धेदम्यान दुखापत झाली होती. मात्र हार्दिकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक केलं. हार्दिकने त्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. तेव्हापासूनच हार्दिकचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. अखेर हार्दिक भारतीय संघात परतला आहे. दरम्यान, निवड समितीने टी 20i मालिकेतून ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी आणि फिनिशर रिंकु सिंह या दोघांना डच्चू दिला आहे.
टी 20I सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) (फिटनेसवर अवलंबून), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर.
🚨 NEWS 🚨#TeamIndia's squad for the 5⃣-match T20I series against South Africa announced.
Details ▶️ https://t.co/3Bscuq6Gri #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0bHLCcbwTD
— BCCI (@BCCI) December 3, 2025
