Download App

WTC 2023 : बीसीसीआयने केली संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन

Team India For  WTC 2023 : बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच बीसीसीआयने याची घोषणा केली आहे. WTC चा अंतिमा सामना हा 7 जूनपासून होणार आहे. यासाठी भारत व ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आधीच पात्र ठरले आहेत.

याआधी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली होती. आता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी संघामध्ये अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. अजिंक्य हा मागील काही महिन्यांपासून कसोटी संघाच्या बाहेर होता. पण आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.

अजिंक्यने यंदाच्या रणजी करंडकामध्ये धावांचा पाऊस पाडला होता. तसेच सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये देखील अजिंक्य हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे आता त्याचे भारतीयसंघात पुनरागमन झाले आहे.

दरम्यान, भारतीय संघ हा असा एकमेव संघ आहे जो सलग दुसऱ्यांदा WTCच्या फायनलमध्ये पोहोचत आहे. याआधीच्या पहिल्या WTC फायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. आता पुन्हा भारताला ही फायनल जिंकण्याची संधी आली आहे.

या खेळाडूंचा संघात समावेश आहे. 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

Tags

follow us