WTC Final 2023 : के. एल. राहुलच्या जागी ईशान किशनची संघामध्ये वर्णी

WTC Final 2023 :  बीसीसीआयने WTC 2023  फायनलसाठी के. एल. राहुलच्याऐवजी ईशान किशनला संघामध्ये स्थान दिले आहे. WTC 2023 ची फायनल लंडनच्या ओव्हल  मैदानावर होणार आहे. के. एल. राहुल हा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी ईशान किशना संधी देण्यात आली आहे.   BCCI names Ishan Kishan as KL Rahul’s replacement for ICC World Test Championship final […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T173153.572

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 08T173153.572

WTC Final 2023 :  बीसीसीआयने WTC 2023  फायनलसाठी के. एल. राहुलच्याऐवजी ईशान किशनला संघामध्ये स्थान दिले आहे. WTC 2023 ची फायनल लंडनच्या ओव्हल  मैदानावर होणार आहे. के. एल. राहुल हा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याजागी ईशान किशना संधी देण्यात आली आहे.

 

केएल राहुलच्या बदलीसोबतच बीसीसीआयने तीन स्टँडबाय खेळाडूंची नावेही जाहीर केली आहेत. यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणार आहेत.

याआधी आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुल जखमी झाला होता. त्याच्या मांड्यांमध्ये क्रॅम्प आला होता. यानंतर राहुलचे स्कॅन करण्यात आले. त्यानंतर राहुल आयपीएल 2023 मधून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर आता तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भाग घेऊ शकणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती.

आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड

आयपीएल 2023 मधून बाहेर पडल्यानंतर केएल राहुलने इंस्टाग्रामवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या दुखापतीबाबत ताजी माहिती दिली आहे. केएल राहुलने लिहिले की, मेडिकल टीमच्या सल्ल्यानुसार मी माझ्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करणार आहे, ही शस्त्रक्रिया लवकरच होऊ शकते. हा निर्णय माझ्यासाठी सोपा निर्णय नव्हता, परंतु मला माहित आहे की पूर्णपणे सावरण्याची ही योग्य वेळ आहे.

 

Exit mobile version