World Cup 2027 रोहित शर्मा खेळणार का? बीसीसीआयने दिली चाहत्यांना मोठी बातमी

World Cup 2027 : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2027 मध्ये दिसणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक

World Cup 2027

World Cup 2027

World Cup 2027 : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक 2027 मध्ये दिसणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना देखील रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार असल्याची देखील चर्चा सुरु होती मात्र या दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत 110 चेंडूंत 138 धावांची खेळी केली होती. तर आता रोहित शर्मावर बीसीसीआयकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

आज मुंबईत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने आढावा बैठक घेतली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया (Devjit Saikia) , मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) , कर्णधार शुभमन गिल (कसोटी आणि एकदिवसीय) व श्रेयस अय्यर (टी20), तसेच ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स’चे (CoE) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) उपस्थित होते. तर वैयक्तिक कारणांमुळे मुख्य निवडकर्त्याला या बैठकीला उपस्थित राहता आले नाही.

या बैठकीनंतर बोलताना सैकिया यांनी रोहितचे कौतुक केले आहे. तो सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. तुम्हाला आणखी काय हवे आहे? त्याने गेल्या सामन्यात 130-140 धावा केल्या. मग चर्चा कशासाठी? जे लोक तर्कवितर्क करत आहेत, त्यांना मी आणखी काही मसाला देऊ इच्छित नाही. यानंतर रोहित शर्मा 2027 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघात असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

तर दुसरीकडे यावेळी सैकिया यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर देखील भाष्य केले. खेळाडूंना खूप जास्त सामने खेळावे लागत असल्यामुळे ते दुखापतग्रस्त होत आहेत. जर तुम्ही त्यांच्या वेळापत्रकावर नजर टाकली, जेव्हा आमचा 15 सदस्यांचा संघ एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, तेव्हा तीन-चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्याआधी खेळाडू दोन महिने आयपीएल (IPL) खेळले होते, ही बाबही आपण लक्षात घेतली पाहिजे. याचा खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होतो. सध्याच्या ‘फ्युचर टूर्स प्रोग्राम’ (FTP) अंतर्गत अशा परिस्थिती कशा टाळता येतील, याचे मार्ग आम्ही शोधत आहोत. दुखापतीनंतर एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कसा परतू शकतो, यासंदर्भात आमची एक कार्यपद्धती (प्रोटोकॉल) आहे.

मिठाईसाठी फक्त शुद्ध चांदीचाच वर्क; सण- उत्सवांच्या काळात तुकाराम मुंढेंचे नवे आदेश –

अशा नको असलेल्या परिस्थिती टाळण्यासाठी योग्य धोरण आखण्याच्या उद्देशाने आम्ही कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांकडून अभिप्राय घेत आहोत. पुढील FTP मध्ये, खेळाडूंना पुरेसा विश्रांती मिळेल, त्यांना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल आणि ‘SENA’ देशांमधील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) कोणत्याही मोठ्या मालिकेपूर्वी ते सराव सामने खेळू शकतील, याची आम्ही खात्री करू.

तर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध 13 सप्टेंबरपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीत होणार आहे. बीसीसीआयकडून या मालिकेसाठी संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

Exit mobile version