मिठाईसाठी फक्त शुद्ध चांदीचाच वर्क; सण- उत्सवांच्या काळात तुकाराम मुंढेंचे नवे आदेश
Tukaram Mundhe : अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकत एफडीएने आतापर्यंत लाखो
Tukaram Mundhe : अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकत एफडीएने आतापर्यंत लाखो रुपयांचे मुद्देमाल जप्त करत संबंधित व्यक्तींवर कारवाई केली आहे. तर आता राज्यात वर्षभरात येणाऱ्या विविध सण- उत्सवांच्या काळात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वर्षभरातील सर्व सण आणि उत्सवांसाठी अन्नसुरक्षेबाबत एकच स्थायी कार्यप्रणाली लागू केली आहे. यापूर्वी राज्यात प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येत होते मात्र आता असं होणार नाही. आता एफडीएकडून फूड सेप्टी कॅलेंडर 1 जानेवारी ते 31 डिसेंबरसाठी तयार करण्यात आले आहे.
एफडीएकडून (FDA) देण्यात आलेल्या माहितीनुसार, सण आणि ‘हाय रिस्क’ अन्नपदार्थांनुसार विशेष तपासणी करण्यात येणार आहे. महाशिवरात्री व इतर उपवासाच्या काळात भगर, साबुदाणा, राजगिरा यांसारखा पदार्थांचे उत्पादन कुठे होते यावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच बुरशीजन्य विषबाधा घडवून आणणाऱ्या अन्नपदार्थांच्या तपासणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. तर राज्यात सणांच्या काळात दुधाची मोठी मागणी असल्याने पहाटेच्या वेळी होणाऱ्या दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीची माहिती घेऊन अचानक छापे टाकले जाणार आहे. तर ईद सारख्या सणांमध्ये मांस, पाणी आणि बर्फाचा वापर वाढतो यावेळी कत्तलखाने, बर्फ तयार करणारे आणि बर्फ गोळा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे सणांच्या काळात विक्री होणाऱ्या मिठाईत केवळ शुद्ध चांदीचाच वर्क वापरला गेला पाहिजे असा नियम देखील एफडीएकडून करण्यात आल्याची माहिती अन्न व औषधे विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी दिली आहे.
पुण्यात डीजेबंदी नाही, मात्र आवाजाची मर्यादा पाळावी लागणार-
महाप्रसादासाठी नवे नियम
तर महाप्रसादासाठी आता राज्यात नवे नियम लागू करण्यात आले आहे. महाप्रसाद, भंडारा आणि लंगर यांसारख्या सामूहिक अन्न वाटप कार्यक्रमांची पूर्वकल्पना एफडीएला देणे आयोजकांवर बंधनकारक राहणार आहे. याचबरोबर या कार्यक्रमात अन्नसुरक्षेचे नियम पाळले जावेत यासाठी आयोजकांना एफडीएतर्फे नियमित प्रशिक्षण देखील देण्याचे नियोजन एफडीएकडून करण्यात आले आहे.