Amitesh Kumar : पुण्यात डीजेबंदी नाही, मात्र आवाजाची मर्यादा पाळावी लागणार
Amitesh Kumar : पुण्यात गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Amitesh Kumar : पुण्यात गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी आता होताना दिसत आहे. तर दुसरीकडे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. याचबरोबर पुण्यात डीजेबंदी नसणार पण आवाजाची मर्यादा पाळणे गणेश मंडळांना बंधनकारक असणार असं देखील अमितेश कुमार म्हणाले.
माध्यमांशी बोलताना अमितेश कुमार (Amitesh Kumar) म्हणाले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून उद्या आरोपीला न्यायालयात (Court) हजर करण्यात येणार आहे. आम्ही न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी करणार आहे असं पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले. तसेच आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना सुरक्षा देखील देण्यात आली आहे. या घटनेचा पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांनी निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची देखील माहिती माध्यमांशी बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे पुण्यात गणेश उत्सवात ध्वनी प्रदूषणासंदर्भातील (Noise Limits) नियमांचे पालन करण्याची भूमिका सर्व गणेश मंडळांनी घेतली असल्याची देखील माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. तसेच नागपूरच्या डीजेबंदी बाबत मला काही माहिती नाही. पुण्यात डिजेबंदी नसणार पण आवाजाची मर्यादा पाळणे गणेश मंडळांना बंधनकारक असणार आहे.
मारहाण करणारा संतोष चव्हाण नेमका कोण?
संतोष चव्हाणबद्दल सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हा कोथरुड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून तो एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करत आहे. तसेच तो राऊतवाडी परिसरातील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष देखील आहे. फक्त डीजेबंदीला विरोध केल्याने त्याने बापट यांना मारहाण केली की या हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास आता पोलिसांकडून सुरु आहे. बापट यांना मारहाण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष चव्हाण म्हणाला की, अजून याला मारायला पाहिजे.त्याला केवळ गणेशोत्सव दिसतो का? हिंदूंच्या सणावर टीका करण्याचे कारण काय? असं यावेळी संतोष म्हणाला. तर तुझी नेमकी भूमिका काय असं त्याला विचारले असता माझी कोणतीही भूमिका नाही, मला काही बोलायचेही नाही, फक्त बापटला अजून मारायचे होते असं देखील संतोष चव्हाण म्हणाला.
तर दुसरीकडे विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची देखील माहिती समोर येत आहे. राऊतवाडी परिसरात राहणारा संतोष चव्हाणवर पुणे शहरात पाच ते सहा गुन्हे दाखल आहे. मारामारी करणे, कट रचने यासारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी या आधीच त्याला ताब्यात घेतलं होतं. गणेश मंडळाचा कार्यकर्ता असलेला संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार असून तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने वडिलांनाही मारहाण केली होती. तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्कही तोडला होता.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘सोशल मीडिया आचारसंहिता’; रील्स पाहण्यावर येणार बंदी?
दरम्यान आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात येऊन काही मित्रांना भेटून देखील गेला मात्र त्यानंतर त्याने आपला फोन बंद केल्याने त्याचा ठाव-ठिकाणा लागत नव्हता अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अटक केली आहे.