तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत: जेव्हा पाकीटावरचे लेबल खोटे ठरते, तेव्हा त्याची किंमत ग्राहकाला मोजावी लागते…

Tukaram Mundhe’s Post जेव्हा पाकीटावरचे लेबल खोटे ठरते, तेव्हा त्याची किंमत ग्राहकालाच मोजावी लागते. एक्सपायरी डेट म्हणजे शाई नव्हे...

Tukaram Mundhe’s Post

Tukaram Mundhe’s Post After Expired Food Racket Bust : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील TTC औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ‘साधना एंटरप्रायझेस’च्या गोदामावर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये मॅगी, लेज, कुरकुरे, बिंगो यांसारख्या नामांकित ब्रँड्सचा साठा जप्त करण्यात आला. कारण या खाद्यपदार्थांच्या पाकीटावरील एक्सपायरी डेटमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. मुदत संपलेला माल पुन्हा विक्रिस काढण्यासाठी हा प्रकार करण्यात आला होता. त्यामुळे FDA ने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांनी एक पोस्ट केली.

आठ-दहा दिवस वाट पाहू मग… शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर शरद पवार स्पष्टच बोलले

तुकाराम मुंढेंची पोस्ट

जेव्हा पाकीटावरचे लेबल खोटे ठरते, तेव्हा त्याची किंमत ग्राहकालाच मोजावी लागते. एक्सपायरी डेट म्हणजे फक्त पॅकेजवरची शाई नव्हे. न्यूट्रिशन लेबल म्हणजे फक्त माहिती नव्हे. ही ग्राहकांना दिलेली वचने असतात. जेव्हा ही वचने जाणूनबुजून बदलली किंवा फेरफार केली जातात, तेव्हा ते केवळ नियमांचे उल्लंघन नसते, तर जनतेच्या विश्वासाचा भंग असतो.

आम्ही तयार केलेली नियम म्हणजे व्यवसायात भीती निर्माण करण्यासाठी नाहीत. त्याऐवजी असे वातावरण तयार करणे आवश्यक आहे, जिथे प्रामाणिक व्यवसायांचे संरक्षण होते, यामुळे उल्लंघने वेळेवर शोधली जातात आणि नागरिकांची फसवणूक होत नाही.

तुम्हालाही सतत स्क्रिनशॉट घ्यायची सवय आहे? संशोधनामध्ये समोर आलं धक्कादायक वास्तव…

‘या’ दिवशी केली होती कारवाई

FDA ने 24 ते 29 ऑगस्ट दरम्यान ही कारवाई केली होती. यात तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना या प्रोडक्टच्या पॅकेजींगवरील मुदत संपलेल्या तारखा पुसल्याचे दिसले आणि त्याजागी नवीन तारखा टाकल्याचे दिसले. हा खाद्यपदार्थांचा साठा पुन्हा मार्केटमध्ये विक्रिसाठी पाठवण्याचे नियोजन होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे FDA ने स्पष्ट केले.

follow us