Download App

वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, BCCI कडून 125 कोटींचे बक्षीस जाहीर

दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला आता बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.

  • Written By: Last Updated:

Team India Price Money:  टी-20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत टीम इंडियाने (Team India) विश्वचषकावर नाव कोरलं आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर आता बीसीसीआयने (BCCI) पैशांचा वर्षाव केला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱ्या भारतीय संघाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. बोर्डाचे सचिव जय शा (Jay Shah) यांनी 30 जून रोजी ही घोषणा केली.

लोकसभा उपाध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीचे अयोध्या कार्ड ? सपाच्या ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर 

यंदाच्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला आयसीसीकडून बक्षीस मिळालं आहेत. त्याचबरोबर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही टीम इंडियासाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. जय शाह यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटलं की, ‘आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 जिंकण्यासाठी टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत असाधारण खेळी, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवलं. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!, असं शाह यांनी लिहिलं.

दरम्यान, यापूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला T20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर धोनीच्याच नेतृत्वाखाली 2011 एकदिवसीय विश्वविजेता बनला तेव्हा प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 2 कोटी रुपयांची रोख किंमत देण्यात आली होती.

आयसीसीकडून 20.40 कोटी रुपयांचे बक्षीसे
2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत  स्पर्धेत 20 संघ सामील झाले होते. या 20 संघाचे  28 दिवस सामने चालले. ICC ने T-20 विश्वचषक 2024 साठी $11.25 दशलक्ष USD ची विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली. अंतिम सामना जिंकणाऱ्या टीम इंडियाला काल रात्रीच किमान $2.45 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 20.40 कोटी रुपये मिळालेत. तर दक्षिण आफ्रिकेने T20 विश्वचषक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावल्याबद्दल दक्षिण आफ्रिका संघाला $1.28 दशलक्ष म्हणजेच 10.67 कोटी रुपये मिळालेत.

follow us