Rohit Sharma : रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लाने दिली सर्वात मोठी अपडेट

Rohit Sharma : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा गेल्या काही

Rohit Sharma

Rohit Sharma

Rohit Sharma : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याने क्रिकेट चाहते नाराजमध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सुरुवातीला रोहित इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करणार असं सांगितलं जात होतं मात्र त्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत शतक झळकावला आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तर आता रोहित शर्मा निवृत्त होणार का? यावर बोलताना बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी सर्वात मोठी अपडेट दिली आहे.

नेमकं काय म्हणाले बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ? 

बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) ‘यूपी टी-20 लीग’च्या चौथ्या हंगामासाठी आयोजित ‘मिनी-लिलावा’ला उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आमच्या संघाचा भाग आहे आणि तो खेळत राहील. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर अनेक चर्चा झाल्या, पण त्यात काहीही तथ्य नाही. सध्या त्याच्या निवृत्तीचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

 रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्माने लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकले त्यानंतर, बीसीसीआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की, सध्या त्याचे संपूर्ण लक्ष केवळ खेळण्यावर आणि चांगली कामगिरी करण्यावर आहे. तो म्हणाला, “माझे काम फलंदाजी करणे आहे. मी मैदानात येतो, खेळतो आणि माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. माझ्या पदार्पणापासूनच अशा चर्चा होत आहेत. जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत त्या सुरूच राहतील. त्याचा मला काहीही फरक पडत नाही. माझ्यासाठी केवळ मैदानावरील कामगिरी महत्त्वाची आहे.

Exit mobile version