Download App

इंग्लंडला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू ॲशेस मालिकेतून बाहेर

Jofra Archer Ruled Out: आगामी इंग्लिश समरच्या आधी जोफ्रा आर्चरच्या रूपाने इंग्लंड क्रिकेट (England cricket) संघाला मोठा झटका बसला आहे. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) अगोदर आयपीएल 2023 (IPL) च्या मुंबई इंडियन्स (MI) मधून दुखापतीमुळे बाहेर पडला आणि आता तो ॲशेस मालिकेतही (Ashes series) खेळताना दिसणार नाही. जोफ्रा पुन्हा एकदा स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंजत आहे.

जोफ्रा आर्चरच्या दुखापतीबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ECB) व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी म्हटले आहे की, जोफ्रा आर्चरसाठी ही वेळ त्रासदायक आणि निराशाजनक आहे. बर्‍याच दिवसांनी जोफ्रा आर्चर संघात परत आल्याने टीमसाठी चांगले करण्याचा प्रयत्न करत होता. पण कोपराच्या दुखापतीने तो पुन्हा एकदा काही काळासाठी संघा बाहेर पडला आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

रॉब की पुढे म्हणाले की, जोफ्राने संघात लवकर परतावे अशी आमची इच्छा आहे. जरी थोडा वेळ लागला तरी आम्ही जोफ्राला इंग्लंडच्या जर्सीमध्ये पुन्हा मैदानावर सर्व फॉरमॅटमध्ये बघू. खेळताना त्रास होत असल्याने कोपरच्या दुखापतीमुळे आर्चर आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला होता.

जवळजवळ 2 वर्षे स्ट्रेस फ्रॅक्चरशी झुंज दिल्यानंतर जोफ्रा आर्चर डिसेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता. जोफ्रा आर्चरने वारंवार दुखापतींमुळे 2021 पासून इंग्लंडसाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. जोफ्रा आर्चरला आता इंग्लंड आणि ससेक्स संघांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जोफ्रा पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी इंग्लंड क्रिकेट संघाला आशा आहे.

Tags

follow us