शाहरुख खाननंतर बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार दिसणार क्रिकेटच्या मैदानात; विकत घेतला संघ

Rotterdam Dockers :  अभिनेता शाहरुख खाननंतर आता आणखी एका बॉलिवूड स्टारने क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली आहे. या स्टारने युरोपियन टी-20 प्रीमियर

Rotterdam Dockers

Rotterdam Dockers

Rotterdam Dockers :  अभिनेता शाहरुख खाननंतर आता आणखी एका बॉलिवूड स्टारने क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली आहे. या स्टारने युरोपियन टी-20 प्रीमियर लीग’ (ETPL) मधील एका संघात गुंतवणूक केली आहे. या सुपरस्टारचं नाव आहे जॉन अब्राहम. जॉनने युरोपियन टी-20 प्रीमियर लीगमध्ये  इतर भागीदारांसह रॉटरडॅम-स्थित संघ विकत घेतला आहे. ही लीग 26 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

‘रॉटरडॅम डॉकर्स’चा सह-मालक बनला जॉन अब्राहम

‘युरोपियन टी20 प्रीमियर लीग’चा पहिला हंगाम सुरू होण्यास अजून दोन महिने बाकी आहेत. त्याआधी बॉलीवूड सुपरस्टार जॉन अब्राहमने (John Abraham) ‘रॉटरडॅम डॉकर्स’ (Rotterdam Dockers) संघात गुंतवणूक करून त्याचे सह-मालकपद स्वीकारले आहे. या उपक्रमात त्याच्यासोबत जॉन्टी ऱ्होड्स, हेनरिक क्लासेन, फाफ डू प्लेसिस आणि मधुकर श्री हे भागीदार आहेत. बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा ETPL चा सह-मालक आहे आणि तो क्रिकेटपटूंसोबतच इतर बॉलीवूड कलाकारांनाही या लीगकडे आकर्षित करत आहे.

जॉन अब्राहमकडे अनेक क्रीडा संघांची मालकी

जॉन अब्राहमकडे आधीपासूनच फुटबॉल आणि हॉकीमधील संघांची मालकी आहे. ‘इंडियन सुपर लीग’मध्ये तो ‘नॉर्थईस्ट युनायटेड एफसी’ या फुटबॉल संघाचा मालक आहे. याव्यतिरिक्त, ‘इंडियन रेसिंग फेस्टिव्हल’मध्ये त्याच्याकडे ‘गोवा एसेस’ फ्रँचायझीची मालकी आहे. तसेच, ‘हॉकी इंडिया लीग’मधील ‘दिल्ली वेव्हराइडर्स’ संघातही त्याची 13% भागीदारी होती. आता तो ETPL मध्येही गुंतवणूक करण्यास सज्ज झाला आहे.

बदनामीचं राजकारण… काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

ETPL कधी सुरू होणार?

‘युरोपियन टी20 प्रीमियर लीग’ (ETPL) 26 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होणार आहे. ही स्पर्धा 20 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि आयर्लंडमध्ये या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण 32 सामने खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहेत. ॲमस्टरडॅम फ्लेम्स, रॉटरडॅम डॉकर्स, एडिनबर्ग कॅसल रॉकर्स, ग्लासगो कॉस्मिक्स, डब्लिन गार्डियन्स आणि आयरिश वुल्व्हज हे संघ युरोपियन टी20 प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करतील.

Exit mobile version