Boxing World Championship: बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी, जरीन अन् लवलीनाने जिंकले सुवर्णपदक

नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. निकहत जरीनने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यातनिकहत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. त्याचबरोबर 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेननेही ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा 5-2 असा पराभव करत सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. या […]

WhatsApp Image 2023 03 27 At 12.31.10 PM

WhatsApp Image 2023 03 27 At 12.31.10 PM

नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. निकहत जरीनने भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. 50 किलो गटाच्या अंतिम सामन्यातनिकहत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. त्याचबरोबर 75 किलो वजनी गटात लवलीना बोरगोहेननेही ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा 5-2 असा पराभव करत सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले. या जागतिक स्पर्धेत भारताने एकूण चार सुवर्णपदके जिंकली.

निकहत जरीनच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या सामन्यातील पहिल्या फेरीचा खेळ खूपच रोमांचक झाला. जरीनने पहिल्या फेरीत काही चांगले प्रदर्शन केले, तर व्हिएतनामच्या टॅमने हिंमत गमावली नाही आणि काही ठोस अपरकट्स उतरवले. असे असतानाही पहिल्या फेरीत रेफ्रींनी एकमताने जरीनच्या बाजूने गुण दिले. जरीनने दुसऱ्या फेरीत चांगली लढत दिली आणि टॅमने ती फेरी 3-2 अशी जिंकली. अंतिम फेरीत पुन्हा एकदा दोन बॉक्सर्समध्ये जरीनची लढत झाली. या तिसऱ्या फेरीत जरीनने विरोधी खेळाडूपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आणि आक्रमण तसेच उत्तम बचावाच्या जोरावर टॅमचा पराभव केला.

NCP Protest : नदी पात्रातील झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता थेट झाडावर 

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण जिंकणारी जरीन ही दुसरी भारतीय महिला बॉक्सर आहे. 26 वर्षीय जरीनने गतवर्षीही महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय अनुभवी एमसी मेरी कोमने या स्पर्धेत विक्रमी 6 वेळा (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018) सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचवेळी, सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006), लेखा केसी (2006), नीतू घनघास (2023) आणि स्वीटी बुरा (2023) या भारतीय बॉक्सर आहेत ज्यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

25 मार्च (शनिवार) रोजी दोन भारतीय बॉक्सर सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची सुवर्णपदक विजेती नीतू घंघासने 48 किलो वजनी गटात आणि अनुभवी बॉक्सर स्वीटी बुराने 81 किलो वजनी गटात सुवर्ण यश मिळविले. नीतूने चमकदार कामगिरी करताना अंतिम सामन्यात मंगोलियाच्या लुत्सायखान अल्तानसेतसेगचा 5-0 असा पराभव केला. त्याचवेळी 30 वर्षीय स्वीटीने लाइट हेवीवेट प्रकारात चीनच्या वांग लीनाचे आव्हान मोडून काढत 4-3 असा विजय मिळवला.

Exit mobile version