मोठी बातमी : IPL च्या हंगामात BCCI चे ब्रॉडकास्ट इंजिनिअर हॉटेल ट्रायडंटमध्ये आढळले मृतावस्थेत

Ian Williams Langford ब्रिटिश नागरिक इयान विल्यम्स लँगफोर्ड हे २४ मार्चपासून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते.

मोठी बातमी : IPL च्या हंगामात BCCI चे ब्रॉडकास्ट इंजिनिअर हॉटेल ट्रायडंटमध्ये आढळले मृतावस्थेत

मोठी बातमी : IPL च्या हंगामात BCCI चे ब्रॉडकास्ट इंजिनिअर हॉटेल ट्रायडंटमध्ये आढळले मृतावस्थेत

British broadcast engineer working for IPL matches found dead in Mumbai hotel : बीसीसीआयसाठी IPL 2026 सामन्यांचे ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करणारे ब्रिटिश नागरिक इयान विल्यम्स लँगफोर्ड यांचा अकस्मात मृत्यू झाला. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधील खोलीत लँगफोर्ड मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रकाशित वृत्तांनुसार लँगफोर्ड हे 24 मार्चपासून ट्रायडन्ट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामन्यानंतर लँगफोर्ड हॉटेलमधील खोलीवर परतले होते. 30 मार्च रोजी हॉटेलच्या रिसेप्शनवरून लँगफोर्ड यांच्या रूममध्ये फोन करण्यात आला. त्यावेळी त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर कर्मचारी रूमजवळ गेले असता त्यावेळीदेखील रूममधून लँगफोर्ड यांचा प्रतिसाद न मिळाल्याने मास्टर कीच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी विल्यम लँगफोर्ड निपचित पडलेले दिसून आले. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले.  रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. लँगफोर्ड हे बीसीसीआय/आयपीएल सामन्यांसाठी प्रसारण अभियंता म्हणून काम करत होते. लँगफोर्ड यांच्या मृत्युप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

 

Exit mobile version