ललित मोदींना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून खटला रद्द

Lalit Modi : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्यावरील अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला आहे. जानेवारीमध्ये ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केले होते की, खटले कोर्टात फिक्स केले जातात. न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली, त्यानंतर ललित मोदींनी न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल 18 एप्रिल रोजी बिनशर्त माफी मागितली होती. ललित मोदी […]

Lalit Modi

Lalit Modi

Lalit Modi : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्यावरील अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला आहे. जानेवारीमध्ये ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केले होते की, खटले कोर्टात फिक्स केले जातात. न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली, त्यानंतर ललित मोदींनी न्यायव्यवस्थेबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल 18 एप्रिल रोजी बिनशर्त माफी मागितली होती.

ललित मोदी यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले होते की, भविष्यात भारतीय न्यायव्यवस्था किंवा न्यायालयांची प्रतिष्ठा कमी होईल असे काहीही करणार नाही. त्यानंतर न्यायमूर्ती एमआर शाह आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने ललित मोदींची माफी स्वीकारली होती. भविष्यात ललित मोदींनी भारतीय न्यायालयांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे ते म्हणाले.

सरकार आल्यास ‘जीएसटी’च हटवणार; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

न्यायालय नेहमीच माफी देण्यावर विश्वास ठेवत असल्याने आम्ही खुल्या मनाने माफी स्वीकारत आहोत, असे खंडपीठाने म्हटले आहे. विशेषतः, जेव्हा माफी बिनशर्त आणि प्रामाणिक असते. त्यामुळे आम्ही माफीनामा स्वीकारून अवमानाची कारवाई बंद करत आहोत, असे म्हटले आहे.

ललित मोदींनी 18 एप्रिलला ट्विट करून माफी मागितली होती. ते म्हणाले होते- 13 जानेवारी आणि 30 मार्चच्या माझ्या सोशल मीडिया पोस्टसाठी मी बिनशर्त माफी मागतो. मला भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल नितांत आदर आहे. न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा कमी होईल असे मी काहीही करणार नाही. मी पुन्हा सांगतो की न्यायपालिकेची प्रतिमा डागाळण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि नाही.

Exit mobile version