Download App

25 वर्षांनंतर न्यूझीलंड करणार इतिहासाची पुनरावृत्ती की भारत मारणार बाजी? जाणून घ्या सर्वकाही …

Champions Trophy 2025 Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) आमनेसामने असणार आहे.

  • Written By: Last Updated:

Champions Trophy 2025 Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) आमनेसामने असणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा (INDvsAUS) पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली आहे तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा (NZvsSA) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 09 मार्च रोजी दुबईमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. 2013 नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघावर मात करावी लागणार आहे.

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडने नेहमीच भारताला कठीण आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे आयसीसीच्या नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या सपाट खेळपट्टीवर भारतीय संघाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ संघात चार फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश करू शकतो. या स्पर्धेत वरुण चक्रवर्ती (Varun Chakraborty) आणि कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) फलंदाजांना अडचणीत आणले आहे. तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी देखील शानदार कामगिरी केली आहे.

तर दुसरीकडे या सामन्यासाठी फलंदाजीत न्यूझीलंड संघ केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रचिन रवींद्रवर (Rachin Ravindra) अवलंबून राहणार आहे. याच बरोबर त्यांच्याकडे कर्णधार मिशेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स सारखे फिरकी गोलंदाज आहे. 2024 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत देखील भारतीय संघाला न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी खूप त्रास दिला होता. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला संपूर्ण ताकदीने मैदानात उतरावे लागणार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी नैरोबी येथे झालेल्या नॉकआउट स्पर्धेत न्यूझीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजय मिळवला होता.

भारत आणि न्यूझीलंडचा संघ खालीलप्रमाणे  

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी.

नगर येथील एमआयडीसीच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला…, पालकमंत्री काय म्हणाले?

सामन्याची वेळ: दुपारी 2.30 वाजल्यापासून.

सामन्याचे ठिकाण: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई.

follow us