Champions Trophy Final Venue : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीच्या सामन्यात (Champions Trophy 2025) पाकिस्तानचा पराभव केला. या विजया बरोबरच टीम इंडियाने (Team India) अंतिम सामन्यात धडक मारली तर ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास येथेच थांबला. भारतीय संघाच्या विजयाने कांगारुंना धक्का (IND vs AUS) बसला आहेच पण त्या पेक्षाही मोठा धक्का पाकिस्तानला (Pakistan Cricket Board) बसला आहे. पाकिस्तान तर आधीच स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे. तरीदेखील काल भारतीय संघाच्या विजयाचा आणखी एक धक्का पाकिस्तानला बसला आहे. हा नेमका काय प्रकार आहे समजून घेऊ..
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले आहे. स्पर्धेतील सर्व सामने पाकिस्तानात होत आहेत. फक्त भारतीय संघाचे सामने दुबईत होत आहेत. याचे कारण म्हणजे भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाऊन खेळण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आयसीसीली भारतीय संघाचे सामने दुबईत शिफ्ट करावे लागले.
सुरुवातीला या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बरीच आदळआपट केली होती. नंतर मात्र बोर्डाला नमते घ्यावे लागले. पाकिस्तानचा क्रिकेट संघ देखील भारता विरुद्धचा सामना दुबईत येऊन खेळला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तान स्पर्धेतूनच बाद झाला. ही फार मोठी नामुष्की पाकिस्तानवर ओढवली. यानंतरही पाकिस्तानचा त्रास कमी झालेला नाही. आता भारताच्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या विजयाने पाकिस्तानला आणखी मोठा झटका बसला आहे.
Champions Trophy : कोहली पुन्हा ‘किंग’; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक !
आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या देशात फायनल सामना आता होणार नाही. आयसीसीने आधीच निश्चित केले होते की जर भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला तर हा सामना पाकिस्तानात होणार नाही. भारताने सर्व सामने दुबईतच खेळले आहेत. काल झालेला उपांत्य फेरीचा पहिला सामनाही दुबईतच झाला होता. त्यामुळे आता 9 मार्च रोजी होणारा अंतिम सामना देखील दुबईतच होणार आहे. याआधी दुसरा सेमी फायनल सामना पाकिस्तानात होईल. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. या सामन्यात विजयी झालेला संघ अंतिम सामन्यासाठी दुबईला रवाना होईल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा उपांत्ये फेरीतील सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आणि भारताचे सामने दुबईत होतील असे स्पष्ट करण्यात आले होते. भारत फायनलमध्ये पोहोचल्यास अखेरचा सामना देखील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होईल असे त्याचवेळी सांगण्यात आले होते. परंतु, जर भारत फायनलमध्ये पोहोचला नसता तर अंतिम सामना लाहोरमध्ये होईल असे निश्चित होते. परंतु, भारताच्या सेमी फायनलमधील विजयामुळे पाकिस्तानच्या सर्व तयारीवर पाणी पडले आहे.
Champions Trophy 2025 : वरुण चक्रवर्तीची दुबईत जादू ! गेलेला सामना भारताला जिंकून दिला