Team India : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये होणार बदल; अनेक सदस्य सोडणार पद ?

Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक बदल

Team India

Team India

Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक बदल होणार असल्याची चर्चा सध्या जोराने सुरु आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना होणार असून या मालिकेनंतर भारतीय संघात काही मोठे बदल होणार असल्याचा दावा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने केला आहे. हे बदल आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमधील संघाच्या खराब कामगिरीशी संबंधित आहे का? याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या एका वृत्तानुसार, भारतीय संघातील कोचिंग स्टाफमधील एक सदस्य आयपीएलमधील एका संघासाठी येणाऱ्या काळात काम करु शकतो. यासाठी चर्चा देखील सुरु आहे. तर सपोर्ट स्टाफमधील आणखी एक सदस्य देखील पद सोडण्याची तयारी करत आहे.

कोचिंग स्टाफमधील अनेक सदस्य टीम इंडिया सोडण्याच्या तयारीत

या वृत्तानुसार, बीबीसीआयसोबत सपोर्ट स्टाफने 2+1 करार केला आहे. यानुसार, सुरुवातीच्या दोन वर्षांनंतर करार आणखी एक वर्षांने वाढवण्याचा पर्याय स्टाफ मेंबरकडे आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, कोचिंग स्टाफमधील एक सदस्य सध्या एका आयपीएल फ्रँचायझीशी चर्चा करत आहे आणि आगामी हंगामापूर्वी त्यांच्यात सामील होण्याची शक्यता आहे. तसेच, कोचिंग स्टाफमधील आणखी एक सदस्यही लवकरच पद सोडण्याची शक्यता आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, सपोर्ट स्टाफमधील बदलांचा संबंध इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनसून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पत्करावा लागणारा पराभव आहे. या मालिकेत आफ्रिकेने भारताचा 2-0  अशा पराभव केला होता. या मालिकेनंतर निवड समिती आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता अनेक सपोर्ट स्टाफमधील मेंबर राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताच्या सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण?

भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये शेवटचा मोठा बदल 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर झाला होता, जेव्हा गौतम गंभीर यांनी राहुल द्रविड यांच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (फील्डिंग कोच) टी. दिलीप यांनी गंभीर यांच्या संघातही आपले स्थान कायम राखले.

Dhamaal 4 ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले 15.50 कोटी –

गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफमध्ये सध्या अभिषेक नायर, मॉर्ने मॉर्केल आणि रायन टेन डोशेट यांचा समावेश आहे. या तिघांव्यतिरिक्त, साईराज बहुतुले अलीकडेच फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक (स्पिन बॉलिंग कोच) म्हणून संघात सामील झाले आहेत.

Exit mobile version