न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात बदल ; प्रसिद्ध कृष्णा बाहेर, स्टार गोलंदाजला संघात संधी

Auqib Nabi : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 मालिकेनंतर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे

Auqib Nabi

Auqib Nabi

Auqib Nabi : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 मालिकेनंतर पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे मात्र या मालिकेपूर्वी भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात वेगवान गोलंदाज आकिब नबीचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णा मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट नसल्याने बीसीसीआयने या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी आकिबचा समावेश संघात केला आहे. आकिब नबीची सुरुवातीला चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली होती, परंतु कृष्णाच्या दुखापतीमुळे आता त्याला पहिल्या तीन सामन्यांच्या संघातही स्थान देण्यात आले आहे.

आकिब नबीबाबत बीसीसीआयचे अपडेट

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, पुरुष निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आकिब नबीला (Auqib Nabi) संघात समाविष्ट केले आहे. वेगवान गोलंदाज, ज्याचे नाव मूळत चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी होते, तो आता एकदिवसीय (ODI) मालिकेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाचा भाग असेल.

बीसीसीआयने (BCCI) काल जारी केलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले आहे की, प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. त्याची या मालिकेत खेळण्याची उपलब्धता पूर्णपणे त्याच्या तंदुरुस्तीच्या प्रमाणपत्रावर (फिटनेस क्लिअरन्स) अवलंबून होती. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असलेला हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज अजूनही पूर्णपणे सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला नाही त्याला तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आणखी काही कालावधीची आवश्यकता आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड: अपडेटेड संघ

पहिल्या तीन सामन्यांसाठी भारताचा अपडेटेड एकदिवसीय संघ:

शुभमन गिल [कर्णधार], रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर [उपकर्णधार], केएल राहुल [यष्टीरक्षक], अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन [यष्टीरक्षक], मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (केवळ पहिल्या सामन्यासाठी) आणि आकिब नबी.

#लायकी अन् नारायण राणेंसोबतचा फोटो; निलेश राणेंना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर-

चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक, उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.

Exit mobile version