Chetan Sharma Resigns : मोठी बातमी ! BCCI चे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

मुंबई : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) मध्ये चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट (Cricket) विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांच्यावर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (26)

Chetan Sharma

मुंबई : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) मध्ये चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट (Cricket) विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे.

चेतन शर्मा यांच्यावर मंगळवारी एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या दरम्यान त्यांनी अनेक खुलासे केले. यात शर्मा यांनी दावा केला होता की देशात अव्वल क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त नसताना देखील फिटनेस सिद्ध करण्यासाठी इंजेक्शन घेत आहेत. तसेच अनेक खेळाडू हे ८० ते ८५ टक्केच फिट असताना इंजेक्शन घेऊन क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन दरम्यान BCCI मधील अनेक गोपनीय गोष्टींचा देखील खुलासा केला. टी 20 वर्ल्डकप दरम्यान जसप्रीत बुमराहच्या पदार्पणाविषयी संघ व्यवस्थापन आणि त्यांच्यात झालेल्या मतभेद बद्दलची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली होती. तसेच जसप्रीत बुमराह अजूनही पूर्णपणे फिट झाला नसून तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका तसेच वनडे मालिकेला देखील मुकणार असल्याचे सांगितले जात होते. चेतन शर्मा यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष यांच्यात इगो प्रॉब्लेम झाला असल्याचे देखील सांगितलं.

Exit mobile version