नवी दिल्ली : इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काउंटी चॅम्पियनशिपच्या या मोसमात तो ससेक्सचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. गेल्या वर्षी त्याने इंग्लिश कौंटीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याची कामगिरी पाहून ससेक्सने पुजाराला कर्णधार बनवले आहे. खुद्द चेतेश्वर पुजाराने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे.
पुजाराने माहिती दिली
इंग्लिश कौंटी संघ ससेक्सचा कर्णधार बनवल्यानंतर पुजारा खूप आनंदी दिसत होता. त्याने ट्विट करून लिहिले, ‘कौंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ससेक्सचा कर्णधार करण्यासाठी रोमांचित’. चेतेश्वर पुजाराचा इंग्लिश कौंटीतील हा दुसरा हंगाम असेल. पहिल्या सत्रात त्याने दमदार कामगिरी केली होती.
सर्वाधिक धावा केल्याबद्दल पुरस्कृत
Corona Updates : धोका वाढला, राज्यात 24 तासात 800 हून अधिक नवे कोरोना रुग्ण
गेल्या वर्षी चेतेश्वर पुजारा ससेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला होता. कौंटी क्रिकेटमधील हा त्याचा दुसरा हंगाम असेल. 2022 साली त्याने चांगली फलंदाजी करताना 13 डावात 109.40 च्या सरासरीने 1094 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 शतके झळकावली. गतवर्षी कौंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजाराची सर्वोच्च धावसंख्या २३२ होती. तो ससेक्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याची कामगिरी पाहता ससेक्स क्रिकेटने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. पुजारा गेल्या वर्षी रॉयल लंडन कपमध्येही खेळला होता.
पहिला सामना 6 एप्रिलपासून होणार आहे
6 एप्रिल 2023 पासून काउंटी चॅम्पियनशिप सुरु होईल. चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखालील संघ डरहमविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. उभय संघांमधील हा सामना होव्ह येथे होणार आहे. दुसरीकडे, पुजाराबद्दल बोलायचे झाले तर अलीकडच्या काळात त्याला फारसे यश मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान त्याने 6 डावात केवळ 140 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी 28 होती.