Corona Updates : धोका वाढला, राज्यात 24 तासात 800 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

Corona Updates : धोका वाढला, राज्यात 24 तासात 800 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळं नागरिक निर्धास्त होते. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona) थैमान घालायला सुरूवात केली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आता महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात मागील 24 तासांत 803 नवे रुग्ण कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळं राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या आकडीवारीनुसार, सध्याच्या घडीला राज्यात 3 हजार 987 कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. मागील गेल्या चोवात तासात राज्यात एकूण 687 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण 79 लाख 95 हजार 232 कोरोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा रिकव्हीर रेट हा 98.13 टक्के असून आज दिवसभरात 803 नवे कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. गेल्या 24 तासात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदर हा 1.82 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आळेल्या 8,66,75,772 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,47,673 नमुने पॉझिटिव्ह आहेत.

न्यायालयाचा कौल तनपुरेंच्या बाजूने, कर्डिलेंना धक्का; राहुरीतील रस्ते होणार चकाचक

पॉझिटिव्हीमध्ये वाढ होत असलेल्या जिल्ह्यात सोलापूर अव्वल आहे. सोलापूरमध्ये पॉझिटिव्हिटीचा दर हा 14.3 आहे. तर मुंबईत हा दर 12.8 टक्के आहे. नागपूरमध्ये 13 टक्के, अकोल्यात 12.3 एवढा आहे. दरम्यान, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीर भारत सरकारच्या सुचनेनुसार, 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या मध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून 2 टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत.

कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भाव पाहता देशाच्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उद्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यासोबत तातडीने बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे असणार आहे. आरोग्य मंत्र्यांनी बोलावलेल्या या कॉन्फरन्सनध्ये देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube