Download App

अफगाणिस्तानचा आफ्रिकेला दणका! पहिल्याच सामन्यात सहा विकेट्सने विजय

दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सने पराभव करत अफगाणिस्तानने विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानचा आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच विजय आहे.

Afghanistan Beat South Africa : अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शारजा (AFG vs RSA) येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने उलटफेर केला. बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सहा विकेट्सने पराभव करत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानचा (Afghanistan) आफ्रिकेविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

या सामन्यात आफ्रिकेची फलंदाजी सुमार राहिली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. आफ्रिकेला 106 धावांतच ऑल आऊट केले. यानंतर फक्त 26 ओव्हर्समध्येच सामनाही जिंकला. फजलहक फारुकीने धारदार गोलंदाजी केली. फलंदाजीत गुलबदीन नायबने 34 धावा केल्या.

एडन मार्करमच्या नेतृत्वातील आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय मात्र अपयशी ठरला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी फक्त 33.3 ओव्हर्समध्येच 106 धावांमध्ये आफ्रिकेचा संपूर्ण संघ बाद केला. वियान मूल्डरने अर्धशतकी खेळी केली. वियानने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त अन्य एकही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच पराभूत केले आहे. आफ्रिकेचा संघ टी 20 वर्ल्डकपमध्ये उपविजेता राहिला आहे.

BCCI ला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसं उत्तर; अफगाणिस्तान बोर्डाने केला मोठा खुलासा

अफगाणिस्तानने मागील दोन वर्षात बलाढ्य संघांना पराभवाचा दणका दिला आहे. यामध्ये पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. आता यामध्ये दक्षिण आफ्रिकेची भर पडली आहे. अफगाणिस्तानने आता दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचे फलंदाज आणि गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे हा सामना अफगाणिस्तानला जिंकता आला.

follow us