IND vs AUS Test Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे सुरू असलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या दिवशी जास्त खेळ होऊ शकला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २७५ धावांचे लक्ष्य दिले होते. या प्रत्युत्तरात भारतीय संघाने एकही विकेट न गमावता ८ धावा केल्या होत्या. यानंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. खराब हवामानाचा अंदाज घेऊन सामना अनिर्णित राहिला. आता पुढील सामना येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.
मोठी बातमी : भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनचा मोठा निर्णय; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत होती. परंतु, चौथ्या दिवशी भारताने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे फॉलोऑनची नामुष्की टाळता आली. यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फक्त २७५ धावांचे टार्गेट दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ८ धावा करताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. हवामानही अतिशय खराब झाले होते. या गोष्टीचा विचार करून सामना अनिर्णित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी त्यांच्या धावसंख्येत 40 धावांची भर घातली. त्यांचा डाव 445 धावांवर संपल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात (India vs Astralia brisbane test 3rd day) झाली. सुमारे अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर भारताचा डाव सुरू झाला. दुसऱ्या चेंडूवरच भारताने यशस्वी जैस्वालची विकेट गमावली. यानंतर शुबमन गिलही डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. या दोन्ही विकेट मिचेल स्टार्कने घेतल्या. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली देखील बाद झाला.
भारताच्या जसप्रति बुमराहने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडनेही धुवाधार फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात १५२ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. स्टिव्ह स्मिथने देखील पहिल्या डावात १०१ धावांचे योगदान दिले होते.