मोठी बातमी! टीम इंडियाचा इंग्लंडला दणका, चौथा सामना अनिर्णित; जडेजा-सुंदर चमकले

IND vs ENG Draw : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे खेळला गेलेला (IND vs ENG) तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दिलेला लीड तोडला. नंतर पूर्ण दिवस फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळला. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या दिवशी इंग्लंडने […]

Ind Vs Eng

Ind Vs Eng

IND vs ENG Draw : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे खेळला गेलेला (IND vs ENG) तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दिलेला लीड तोडला. नंतर पूर्ण दिवस फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळला.

ओल्ड ट्रॅफर्डमध्ये चौथ्या दिवशी इंग्लंडने भारतावर 311 धावांची आघाडी घेतली होती. नंतर गोलंदाजी करताना पहिल्याच ओव्हरमध्ये भारताचे दोन फलंदाज केले. त्यामुळे हाही सामना भारत गमावणार अशी चिन्हे दिसू लागली होती. परंतु, सामन्यातील शेवटच्या पाच सेशनमध्ये शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकांसह केएल राहुलच्या अवि्स्मरणीय खेळीने भारतीय संघाचा पराभव टळला.

कसोटी मालिकेत टीम इंडिया 1-2 अशा फरकाने पिछाडीवर होती. मालिका गमावण्याचा धोका वाढला होता. चौथ्या दिवशी कर्णधार गिल आणि केएल राहुल या दोघांनी 174 धावांची भागीदारी केली. यानंतर पाचव्या आणि शेवटच्या दिवशी 137 धावांचा लीड तोडणे आवश्यक होते. शेवटच्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये बेन स्टोक्सने केएल राहुलला तंबूत धाडले. शतकाला 10 धावा कमी असताना राहुल बाद झाला. तर दुसरीकडे शुभमन गिल दुखापतग्रस्त असतानाही त्याने एका बाजू सांभाळून धरली होती.

रोमांचक सामना, इंग्लंडचा विजय पण चर्चा सौरव गांगुलीची.., लॉर्ड्स कसोटीत नेमकं घडलं तरी काय?

शुभमन गिलने या मालिकेतील त्याचे चौथे शतक पूर्ण केले. पहिले सेशन संपण्याच्या काही वेळ आधी जोफ्रा आर्चरने गिलला बाद केले. गिल बाद झाल्याने टीमच्या अडचणी वाढल्या. पण हाच तो क्षण होता जो इंग्लंडसाठी घातक सिद्ध झाला. मैदानात आलेल्या रवींद्र जडेजा पहिल्याच चेंडूवर स्लीपमध्ये कॅच देऊन बसला पण जो रुटला हा कॅच टिपता आला नाही.

Exit mobile version