Rohit Sharma : भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या (Rohit Sharma) दमदार कामगिरी करत आहे. क्रिकेटच्या प्रत्येक (Team India) प्रकारात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या (Bangladesh) मालिकेत रोहितने सर्वाधिक रन केले होते. या मालिकेत भारतीय फलंदाज धावा करताना अक्षरशः संघर्ष करत होते. त्याचवेळी रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत दोन अर्धशतके झळकावली. या सीरिजमध्ये रोहितने उत्तुंग षटकार खेचले. मात्र तरीही रोहित शर्मा या वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या क्रमांकावर सुद्धा भारतीय फलंदाजच आहे.
या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंचा विचार केला तर यामध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचं नाव आहे. यशस्वीने या वर्षात आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये यशस्वीने एकूण 42 षटकार खेचले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने या वर्षात आतापर्यंत 20 सामने खेळले असून एकूण 38 षटकार मारले आहेत.
गावस्कर, सचिनला जे जमलं नाही ते रोहित शर्माने करून दाखवलं, खास विक्रमांवर कोरलं नाव
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हाँगकाँगचा फलंदाज बाबर हयात आहे. या खेळाडूने आतापर्यंत 36 षटकार मारले आहेत. याच क्रमांकावर अफगाणिस्तानचा (Afghanistan) फलंदाज गुरबाज देखील आहे. त्यानेही 36 षटकार मारले आहेत. 2024 मध्ये भारताच्या यशस्वी जयस्वालने सर्वाधिक षटकार मारले आहेत. तसेच सर्वाधिक धावा करण्यातही यशस्वीच आघाडीवर राहिला आहे. यशस्वीने 1033 रन बनवले आहेत तर रोहित शर्माने 990 रन केले आहेत.