Ravichandran Ashwin Retirement : टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने तडाकाफडकी (Ravichandran Ashwin) निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाची क्रिकेटविश्वात चर्चा झाली होती. कारण, कुणालाच अपेक्षित नव्हता असा निर्णय अश्विनने घेतला होता. खरंच अश्विनने निवृत्तीचा निर्णय का घेतला, अश्विन आणखी काही वर्षे सहज खेळू शकला असता हे माहिती असतानाही त्याने हा निर्णय का घेतला असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले होते. या प्रश्नांचं उत्तर अश्विननेच दिलं आहे. मला आणखी क्रिकेट खेळण्याची इच्छा होती असे अश्विन एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत म्हणाला.
अश्विन निवृत्त झाला अन् वादात अडकला, म्हणाला, हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही तर..
निवृत्ती घेण्याचं कारण सांगताना अश्विन म्हणाला, मला आणखी क्रिकेट खेळायचं होतं पण जागा कुठे आहे. भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नाही पण आता आणखी कुठेतरी मला क्रिकेटशी प्रामाणिक राहायचंय. मला फेअरवेल कसोटी सामना खेळायचा आहे पण मला संघात जागा मिळत नाही. आता अशी कल्पना करा मी संघात आहे पण माझा फेअरवेल सामना बाकी आहे. पण मला या गोष्टी नको आहेत कारण माझ्यात अजूनही क्रिकेट बाकी आहे.
मी आणखी क्रिकेट खेळू शकलो असतो पण तुम्ही निवृत्ती का घेतली नाही यापेक्षा निवृत्ती घेतली हे जास्त चांगलं झालं. एक गोष्ट नक्की सांगेन की क्रिकेट कारकिर्दीत आपल्याला जे व हवं आहे तसंच घडेल असे नाही. पण मी निवृत्त झाल्यावर तसं काही नव्हतं. हे सर्व शिकण्याबद्दल आहे. तो आम्हाला जो आनंद देतो त्यासाठी आम्ही खेळत असतो असेही अश्विन म्हणाला.
तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण 106 कसोटी सामने खेळले आहेत. 116 एकदिवसीय आणि 65 टी 20 सामन्यातही अश्विन खेळला आहे. या सामन्यांतील गोलंदाजीचा विचार केला तर कसोटी सामन्यांत 537, एकदिवसीय सामन्यांत 156 आणि टी 20 सामन्यांत 72 विकेट त्याच्या नावावर आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजीत त्याने सहा शतके देखील केली आहेत.