Download App

बांग्लादेशचा कर्णधार ठरला! शाकिब अल हसनच्या खांद्यावर धुरा; विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करणार

विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषकासाठी बांग्लादेशचा कर्णधार ठरला आहे. अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनवर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आता यापुढील विश्वचषक स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत शाकिब बांग्लादेश संघाचं नेतृत्व करणार आहे. ही घोषणा बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी केली आहे. (shakib al hasan has been appointed bangladesh captain for asia cup and world cup)

‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

बांग्लादेश संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र, पंतप्रधानांच्या विनंतीनंतर तमीम इक्बालने निवृत्ती मागे घेण्यात आली आहे. आता तमीम इक्बाल विश्वचषक संघात खेळणार आहे. मात्र, कर्णधार कोण असणार? असा प्रश्न पडला होता. अखेर तमीम इक्बालच्या जागी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनची निवड करण्यात आली आहे.

‘सर सलामत तो पगडी पचास, पुन्हा असं करू नका’; आव्हाडांचा CM शिंदेंना मैत्रीचा सल्ला

आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी उद्या संघ जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवड समितीकडून 17 सदस्यांचा संघ घोषित करण्यात येणार आहे. शाकिब अल हसन शिवाय लिटन दासचंही नाव कर्णधारपदासाठी चर्चेत होतं परंतु क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्वात अनुभवी खेळाडूवर ही जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, शाकिब अल हसनने आत्तापर्यंत टी-20 सामन्यांसाठी बांगलादेश संघाचं नेतृत्व केलं आहे. आता तो वनडे सामन्यांमध्येही आपल्या संघाचे नेतृत्व करणार आहे. शाकिबने आत्तापर्यंत 50 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले असून त्यामध्ये 20 सामने संघाने जिंकले आहेत.

Tags

follow us