Download App

आफ्रिकेचा पराक्रम! दुसऱ्या सामन्यात विंडीजचा पराभव करत मालिकाही जिंकली

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेने केला वेस्ट इंडिजचा पराभव.

SA vs WI 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी (SA vs WI) सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) वेस्टइंडिजचा पराभव केला. या विजयाबरोबरच आफ्रिकेने कसोटी मालिका देखील जिंकली आहे. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विंडीजचा (West Indies) पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने 1-0 अशा फरकाने मालिका खिशात घातली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.

South Africa vs India : आफ्रिका 176 धावांवर ऑलआऊट; जिंकण्यासाठी भारतासमोर 79 धावांचे टार्गेट

हा सामना गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना रोमांचक ठरला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात फक्त 160 धावांत गारद झाला. त्यानंतर विंडीजचा डावही गडगडला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी धारदार मारा केला त्यामुळे विंडीजचे फलंदाज कसेतरी 144 धावा करू शकले. पहिल्या डावात दोन्ही संघांच्या गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांत ऑल आऊट झाला. सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 247 धावा करायच्या होत्या.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजच्या संघाची सुरुवात चांगली झाली. काही वेळानंतर मात्र आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विकेट घेण्यास सुरुवात केली. संघाच्या 103 धावा झालेल्या असताना निम्मे फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर 104 धावा झालेल्या असताना सहावी विकेट पडली. यानंतरही विकेट पडत राहिल्या. त्यामुळे फक्त 222 धावा करता आल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर विआन मुल्डर आणि डॅन पिएड यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. अशा पद्धतीने आफ्रिकेच्या संघाने हा सामना जिंकला. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे 1-0 अशा फरकाने आफ्रिकेने मालिकाही जिंकली. आता कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघात टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. आता या मालिकेत कुणाचं पारडं जड राहणार याची उत्सुकता आहे.

आफ्रिकाच नाही टीम इंडियानेही केलाय ‘हा’ कारनामा; ‘त्या’ दोन सामन्यांत काय घडलं होतं?

follow us