Download App

टीम इंडियाचा ‘यशस्वी’ पाठलाग; चौथ्या सामन्यात वेस्टइंडिजचा दणदणीत पराभव

IND vs WI : भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत चौथ्या टी 20 सामन्यात विंडीज संघावर मात पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताने 9 गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघानेही दमदार खेळ करत विंडीजच्या हातून विजय खेचून आणला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिज संघाकडून शिमरोन हेटमायरने सर्वाधिक 61 धावा केल्या. शाई होपने 45 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर संघाने 178 धावांचे लक्ष्य ठेवले. अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या.

टीम इंडियाने रचला इतिहास, मलेशियाला हरवून चौथ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

या सामन्यात वेस्टइंडिज संघाने दिलेले आव्हान मोठे होते. सुरुवातीपासूनच वेगवान खेळ करणे गरजेचे होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल मैदानावर आले. डावाची सुरुवात करताना गिलने 77 धावा ठोकल्या. जयस्वालनेही 84 धावांची शानदार खेळी केली. या दोघांनीच 165 धावांची भागीदारी करून टाकली. त्यामुळे वेस्टइंडिजने मोठे आव्हान दिल्यानंतरही भारतीय संघाने तब्बल तीन ओव्हर शिल्लक ठेऊन सामना जिंकला.

हा सामना जिंकल्यानंतर पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता पाचवा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोचा राहणार आहे.  या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. तरच मालिका विजय साकारता येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करतील.

Tags

follow us