टीम इंडियाने रचला इतिहास, मलेशियाला हरवून चौथ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

टीम इंडियाने रचला इतिहास, मलेशियाला हरवून चौथ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

Asian Champions Trophy 2023 Final : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे. भारताकडून जुगराज सिंग (19वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (45वे मिनिट), गुरजंत सिंग (45वे मिनिट) आणि आकाशदीप सिंग (56वे मिनिट) यांनी गोल केले. दुसरीकडे मलेशियाकडून अझराई अबू कमाल, राझी रहीम आणि एम. अमिनोद्दीन यांनी गोल केले.

भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. आता या स्पर्धेचे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ बनला आहे. तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तानला भारताने या बाबतीत मागे टाकले आहे. भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त, केवळ कोरियाने ही स्पर्धा एकाच वेळी जिंकली आहे. 2021 च्या मोसमात कोरियाने विजेतेपद पटकावले होते.

वेस्ट इंडिजने उभारली मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या, हेटमायर-होपने धू धू धुतले

अंतिम सामन्यात भारताने गोल करायला सुरुवात केली. खेळाच्या 9व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर हा उत्कृष्ट गोल केला. त्यानंतर खेळाच्या 14व्या मिनिटाला अझराई अबू कमालने मैदानी गोल करून स्कोअर 1-1 असा केला. यानंतर दुसऱ्या क्वार्टरचा खेळ पूर्णपणे मलेशियाच्या नावावर होता, त्यात पाहुण्या संघाने दोन गोल केले. 18व्या मिनिटाला अनुभवी खेळाडू राझी रहीमने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर 28व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीननेही पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. मध्यंतरापर्यंत मलेशिया 3-1 ने आघाडीवर होता.

दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची सही, केजरीवालांचे अधिकाऱ्यांवरील नियंत्रण संपले

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटात भारताने दोन गोल केले. सर्वप्रथम कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर दमदार गोल केला. काही सेकंदानंतर गुरजंत सिंगने मैदानी गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगने भारतासाठी निर्णायक गोल केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube