U19 Asia Cup Final India beat Bangladesh : भारतीय महिला अंडर १९ क्रिकेट टीमने मोठी कामगिरी केली आहे. बांग्लादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या (U19 Asia Cup) अंतिम सामन्यात चमकदार खेळ करत भारतीय संघाने बांग्लादेशचा (Bangladesh) पराभव केला. या विजयाबरोबरच ट्रॉफीवरही नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ११७ धावा (IND vs BAN) केल्या. यामध्ये तृषाने अर्धशतक करत मोलाचे योगदान दिले. बांग्लादेशसमोर फार मोठं आव्हान नव्हतं मात्र अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने या लहान लक्ष्याचाही बचाव केला.
चक दे इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा भारतात, चीनचा 1-0 ने उडवला धुव्वा
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे बांग्लादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. शेवटी फक्त ७६ धावांवर बांग्लादेशचा संघ ऑल आउट झाला. नाणफेक गमावल्यानंतरही टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. खरंतर प्रथम फलंंदाजी करताना भारताचीही सुरुवात चांगली झाली नव्हती. ८४ धावांवर निम्मा संघ बाद झाला होता.
विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला तृषा मैदानात टिकून होती. तृषाने ४७ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तिच्या या अर्धशतकाच्या बळावर भारताला २० ओव्हर्समध्ये ११७ धावा करता आल्या. मिथिला विनोदने १७ तर कर्णधार निकी प्रसादने १२ धावा केल्या.
बांग्लादेशसमोर माफक आव्हान होतं. त्यामुळे भारत सामना जिंकेल की नाही असा प्रश्न होता. परंतु, गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. बांग्लादेशची सुरुवातही खराब राहिली. आयुषी शुक्लाने तीन तर पारुनिका सिसोदिया आणि सोनम यादवने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. १८.३ ओव्हर्समध्येच बांग्लादेशचा संघ ७६ धावांवर ऑल आउट झाला आणि भारतीय संघाने ४१ धावांनी हा सामना जिंकला. याआधी बांग्लादेशच्या पुरुष क्रिकेट संघाने भारताचा पराभव करून आशिया कप जिंकला होता. या पराभवाचा बदला भारतीय महिला क्रिकेट संघाने घेतला.
शाब्बास टीम इंडिया! भारताच्या लेकींचा पराक्रम, वेस्टइंडिजचा ६० धावांनी पराभव