Download App

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! महामु्काबला ठरला; ICC कडून टी20 विश्वचषकाची घोषणा

आयसीसीने महिलांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेची घोषणा (Women's T20 World Cup 2026) केली आहे.

Women’s T20 World Cup 2026 : आयसीसीने महिलांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेची घोषणा (Women’s T20 World Cup 2026) केली आहे. 2026 मध्ये ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे. टूर्नामेंट 12 जूनपासून सुरू होणार आहे. 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर फायनल सामना खेळवला जाणार आहे. विश्वचषकातील सर्व सामने इंग्लंडमध्येच होणार आहेत. महत्वाचे म्हणजे या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) एकाच ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही संघांत सामना होणार का? आयसीसीने नेमकं (ICC) काय नियोजन केलं आहे? याची माहिती घेऊ या..

भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांतील संबंध तणावाचे (India Pakistan Tension) आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला (Pahalgam Terror Attack) आहे. याचा परिणाम क्रिकेटवर झाला आहे. कितीतरी आधीपासूनच दोन्ही देशांत क्रिकेट सामने झालेले नाहीत. मात्र आयसीसी स्पर्धांत तटस्थ ठिकाणी दोन्ही संघात सामने होतात. त्यानुसार महिला विश्वचषकातही भारत पाकिस्तान टक्कर होणार आहे. दोन्ही संघात 14 जून रोजी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजल्यापासून सुरू होईल.

या स्पर्धेत दोन्ही संघांत दोन सामने होऊ शकतात अशी शक्यता आहे. ग्रुप स्टेज व्यतिरिक्त दोन्ही टीम सेमी फायनल किंवा फायनलमध्ये आमनेसामने असू शकतात. या स्पर्धेत एकूण 12 टीम दोन गटांत विभागण्यात आल्या आहेत. ग्रुप 1 मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि दोन क्वालीफाय करणाऱ्या टीम असतील. ग्रुप 2 मध्ये इंग्लंड, वेस्टइंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका आणि दोन क्वालिफाय करणारे संघ असतील. स्पर्धेतील सामने इंग्लंडमधील एजबेस्टन, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड, हॅम्पशर, हेडिंग्ले, द ओव्हल आणि लॉर्ड्स स्टेडियम या ठिकाणी होणार आहेत.

आता फक्त चार दिवसांची कसोटी, ICC मोठ्या बदलांच्या तयारीत; जाणून घ्या, मेगा प्लॅन!

टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा

महिला टी20 विश्वचषकाची सुरुवात सन 2009 पासूनच झाली होती. पहिला विश्वकप इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी 2010, 2012 आणि 2014 मधील विश्वकप जिंकला होता. 2016 मध्ये वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत रेकॉर्ड मोडले. यानंतर ऑस्ट्रेलियाने पु्न्हा 2018, 2020 आणि 2023 मधील विश्वचषकावर नाव कोरले. 2024 मधील विश्वचषक न्यूझीलंडने जिंकला होता. या सामन्यात किवी संघाने आफ्रिकेला पराभूत केले होते.

टी 20 वर्ल्डकप 2026 वेळापत्रक

12 जून : इंग्लंड वि. श्रीलंका
13 जून : क्वालीफायर वि. क्वालीफायर
13 जून : ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका
13 जून : वेस्टइंडिज वि. न्यूझीलंड
14 जून : क्वालीफायर वि. क्वालिफायर
14 जून : भारत वि. पाकिस्तान
16 जून : न्यूझीलंड वि. श्रीलंका
16 जून : इंग्लंड वि. क्वालिफायर
17 जून : ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर
17 जून : भारत वि. क्वालिफायर
17 जून : दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान
18 जून : वेस्टइंडिज वि. क्वालिफायर
19 जून : न्यूझीलंड वि. क्वालिफायर
20 जून : ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर
20 जून : पाकिस्तान वि. क्वालिफायर
20 जून : इंग्लंड वि. क्वालिफायर
21 जून : वेस्टइंडिज वि. श्रीलंका
21 जून : दक्षिण आफ्रिका वि. भारत
23 जून : न्यूझीलंड वि. क्वालिफायर
23 जून : श्रीलंका वि. क्वालिफायर
23 जून : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
24 जून : इंग्लंड वि. वेस्टइंडिज
25 जून : भारत वि. क्वालिफायर
25 जून : द. आफ्रिका वि. क्वालिफायर
26 जून : श्रीलंका वि. क्वालिफायर
27 जून : पाकिस्तान वि. क्वालिफायर
27 जून : वेस्टइंडिज वि. क्वालिफायर
27 जून : इंग्लंड वि. न्यूझीलंड
28 जून : द. आफ्रिका वि. क्वालिफायर
28 जून : ऑस्ट्रेलिया वि. भारत
30 जून : सेमी फायनल 1
2 जुलै : सेमी फायनल 2
5 जुलै : फायनल

follow us