आता फक्त चार दिवसांची कसोटी, ICC मोठ्या बदलांच्या तयारीत; जाणून घ्या, मेगा प्लॅन!

आता फक्त चार दिवसांची कसोटी, ICC मोठ्या बदलांच्या तयारीत; जाणून घ्या, मेगा प्लॅन!

ICC Ready for 4 day Test Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (World Test Championship) चार दिवसांच्या कसोटीला मान्यता देण्यास तयार आहे. लहान देशांसाठी क्रिकेट अधिक सुलभ आणि व्यावहारिक व्हावे असा उद्देश यामागे आहे. आयसीसीचे चेअरमन जय शाह (Jay Shah) यांनीच या संभाव्य निर्णयाचं समर्थन केलं आहे. यात भारतासह तीन देशांना सूट मिळू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 सायकलमध्ये 9 क्रिकेट संघांत 27 सीरिज खेळल्या जातील. यातील 17 सीरिज अशा असतील ज्यात फक्त दोन सामने होतील. तर सहा सीरिजमध्ये 3-3 कसोटी सामने खेळवले जातील. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांविरुद्ध एकूण 5-5 टेस्ट मॅच खेळतील.

चार दिवसांच्या टेस्टला जय शाहांचा पाठिंबा

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार WTC फायनल सामन्याच्या चर्चेदरम्यान आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी 2027-29 वर्ल्ड टेस्ट सायकलसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना समर्थन दिलं आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला एशेज, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीसाठी 5 दिवसांच्या 5 कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यास परवानगी राहिल.

आयसीसीने याआधी सन 2017 मध्ये चार दिवसांच्या कसोटी सामन्याला मान्यता दिली होती. याअंतर्गत इंग्लंडने झिम्बाब्वे विरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर इंग्लंडने 2019 आणि 2023 मध्ये आयर्लंड विरुद्ध चार दिवसांचे टेस्ट (England vs Ireland) मॅच खेळल्या होत्या. आता डब्ल्यूटीसीत याचा समावेश झाला तर हा एक मोठा बदल ठरेल.

मोठी बातमी! हरभजन अन् युवराज सिंह ED च्या कचाट्यात ‘हा’ अभिनेताही अडकला, चौकशी सुरू

चार दिवसांच्या कसोटीत काय खास

अनेक लहान देश जास्तीचा खर्च आणि वेळेअभावी कसोटी क्रिकेट मालिका आयोजित करण्यास टाळाटाळ करतात. पण जर कसोटी सामना एक दिवसाने कमी केला तर तीन सामन्यांची एक सिरीज तीन आठवड्यांच्या आत संपवता येईल. चार दिवसांच्या कसोटी सामन्यात प्रत्येक दिवशी 98 ओव्हर्स टाकण्याचे निश्चित असेल. सध्या एका दिवसात 90 ओव्हर टाकल्या जातात. यामुळे वेळेचा अपव्यय कमी होईल असा तर्क दिला जात आहे.

WTC 2025-27 मध्ये 5 दिवसांची कसोटी

बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका कसोटीबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 ची सायकल सुरू झाली आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टीम इंडिया या सायकलची सुरुवात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकेने करेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर 20 ते 24 जून दरम्यान होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-27 मध्येही कसोटी सामने पाच दिवसांचेच असतील.

मोठी बातमी! देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ टूर्नामेंटने होणार सुरुवात

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube