Yuvraj Singh, Harbhajan Singh : माजी भारतीय क्रिकेपटून युवराज सिंह (Yuvraj Singh), हरभजन सिंग आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्या अडचण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या माजी खेळाडूंचं नाव बेकायदेशीर सट्टेबाजी अॅपला प्रमोट करण्याच्या प्रकरणात आलं आहे. या प्रकरणी या तिघांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि उर्वशी रौतेला यांचंही नाव समोर आलं आहे. या प्रकरणात ईडी या सर्वांचीच चौकशी करत आहे. हा तपास 1XBet यांसारख्या प्रतिबंधित प्लॅटफॉर्मशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
ईडीचं म्हणणं आहे की या प्लॅटफॉर्म जाहिराती आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना फसवलं जात आहे. 1 एक्सेबट यांसारखे प्लॅटफॉर्म सेलिब्रिटी मंडळींना सोबत घेत लोकांना धोका देण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी ईडीने धडक कारवाईस सुरुवात केली. या अॅप्सना प्रमोट करणारे अभिनेते माजी क्रिकेपटूही ईडीच्या चौकशीच्या कचाट्यात सापडले आहेत.
भारतीय संघाला धक्का, इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी
रिपोर्ट्सनुसार ईडीला तपासात असं आढळून आलं आहे की हे प्लॅटफॉर्म्स 1 एक्सबेट यांसारख्या नावांचा वापर करुन प्रचार करतात. वेब लिंक आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून युजर्सना बेकायदेशीर सट्टेबाजी साइट्सवर पाठवण्याचं काम केलं जातं. ईडीनुसार हा प्रकार भारतीय कायद्यांचं उल्लंघन करतो. असे प्लॅटफॉर्म स्वतःला स्किल बेस्ड गेम बनवतात. पण हे एका रिग्ड एल्गोरिथमचा वापर करतात. याच मुळे हे प्लॅटफॉर्म जुगाराच्या कक्षेत येतात.
ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या अॅप्सची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2023-24 मध्ये गाजलेला महादेव ऑनलाइन सट्टा घोटाळा मोठा होता. यात काही राजकीय नेत्यांची नावं आली होती. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचंही नाव या घोटाळ्यात आलं होतं. घोटाळ्यातून लाभ मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राजकारण म्हणून माझ्यावर असे आरोप करण्यात आल्याचे स्पष्टीकरण बघेल यांनी त्यावेळी दिले होते.
महादेव अॅपच्या प्रमोटर लोकांनी ऑपरेशन सुरुच ठेवण्यासाठी काही फेयरप्ले अॅप तयार केले होते. ईडीनुसार महादेव अॅप घोटाळा हा सहा हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे असा अंदाज आहे. त्यानंतर आता आणखी एक अॅपचं प्रकरण समोर आलं आहे. या बेटिंग अॅपला प्रमोट केलं म्हणून माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचीही चौकशी होत आहे. यामुळे क्रिकेट आणि सिनेविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
गोलंदाजांना गुडन्यूज! आयसीसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’मध्येही बदल