गोलंदाजांना गुडन्यूज! आयसीसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; ‘कन्कशन सब्स्टीट्यूट’मध्येही बदल

ICC Rule Change : एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांत संतुलन स्थापित (ICC Rule Change) करण्यासाठी आयसीसीने नवीन दोन चेंडूंच्या नियमांत मोठा बदल केला आहे. याबरोबरच क्रिकेटच्या सर्व प्रकारांत कन्कशन सब्स्टीट्यूटसाठी (डोक्यात दुखापत झाल्याने बदलली जाणारी खेळाडू व्यवस्था) देखील नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नवीन नियम येत्या 17 जूनपासून दोन कसोटी सामने, 2 जुलैपासून वनडे तर 10 जुलैपासून टी20 सामन्यांसाठी लागू होणार आहेत.
आतापर्यंतच्या नियमात एकदिवसीय सामन्यांत प्रत्येक (Cricket News) डावाची सुरुवात दोन्ही बाजूंनी नवीन चेंडूने केली जात होती. म्हणजेच दोन्ही बाजूंनी पूर्ण 50 ओव्हर्सपर्यंच नवीन चेंडूचा वापर केला जात होता. आता नव्या नियमानुसार फक्त 34 ओव्हर्सपर्यंतच दोन्ही चेंडूंचा वापर करता येईल. 34 ओव्हरनंतर गोलंदाजी करत असलेल्या संघाला दोघांपैकी एका चेंडूची निवड करावी लागेल. याच चेंडूने 50 ओव्हर्स पूर्ण कराव्या लागतील.
मोठी बातमी! देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ टूर्नामेंटने होणार सुरुवात
आयसीसीने नियम का बदलला
आयसीसीचं म्हणणं आहे की हा बदल फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन स्थापित करण्यासाठी केला आहे. नवीन चेंडूद्वारे गोलंदाजांना स्विंग आणि सीम मूव्हमेंट कमी मिळतो. जर मॅचमधील पहिली इनिंग सुरू होण्याआधीच मॅच 25 ओव्हर्स किंवा त्यापेक्षा आणखी कमी केले गेली तर अशा परिस्थितीत एकाच नव्या चेंडूचा वापर करता येणार आहे.
कन्कशन सब्स्टीट्यूटसाठी नवा नियम
नव्या नियमानुसार मॅच सुरू होण्याआधी प्रत्येक टीम पाच संभावित कन्कशन सब्स्टीट्यूट खेळाडूंची नावे सामनाधिकाऱ्यांना देईल. यामध्ये खेळाडूंच्या भूमिका निश्चित असतील. यात एक विकेटकीपर, एक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक स्पिनर आणि एक ऑलराउंडरचं नाव द्यावं लागेल. ही व्यवस्था यावर्षी जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वाद झाल्यानंतर लागू करण्यात आली आहे. हा सामना भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) असा होता.
या सामन्यात भारतीय संघाने (Team India) शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाला कन्कशन सब्स्टीट्यूट (Harshit Rana) म्हणून सहभागी करुन घेतले होते. राणाने या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. परंतु, त्याच्या सहभागावरून टीका झाली होती. जर एखादा नामित सब्स्टीट्यूट खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या जागी जशास तसा सिद्धांतानुसार दुसऱ्या खेळाडूला परवानगी मिळू शकते. परंतु, हा निर्णय सामनाधिकाऱ्यावर अवलंबून असेल. या नव्या नियमांमुळे क्रिकेट आधिक पारदर्शक आणि संतुलित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
WTC 2023-25 द. आफ्रिका अन् ऑस्ट्रेलियावर बक्षिसांचा वर्षाव, टीम इंडियासह 6 टीमही मालामाल