‘गोल’चा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; 146 गोलांसह 23 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास

Cristiano Ronaldo ने 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर पोर्तुगालकडून निवृत्ती जाहीर केली. 234 सामने, 146 गोल.

Cristiano Ronaldo Retirement

Cristiano Ronaldo Retirement

Cristiano Ronaldo Retirement : फुटबॉल जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलीय. तब्बल 23 वर्षे पोर्तुगालची जर्सी घालून मैदान गाजवणारा रोनाल्डो नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय ब्रेकनंतर राष्ट्रीय संघाकडून खेळणार नाही. पोर्तुगालची प्रसिद्ध नंबर-7 जर्सी आता पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आल्याचे 41 वर्षीय स्टार खेळाडूने सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर सांगितले आहे.

रोनाल्डोने पोर्तुगालसाठी 234 सामने खेळत तब्बल 146 गोल केले आहेत. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर कोरला गेलेला आहे. रोनाल्डोच्या निवृत्तीमुळे पोर्तुगालच्या फुटबॉल इतिहासातील एका ऐतिहासिक अध्यायाची सांगता होणार आहे.


आई तू जिथे असशील तिथून परत ये… ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर जगदीश कांबळेंचे शब्द ऐकून माधुरीही झाली भावुक!

23 वर्षांचा प्रवास, 146 गोल आणि ऐतिहासिक विक्रम
रोनाल्डोने ऑगस्ट 2003 मध्ये पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पर्दापण केले होते. अवघ्या 18 वर्षांच्या वयात सुरू झालेला हा प्रवास पुढे त्याला संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आणि कर्णधार बनवणारा ठरला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या उपलब्धींमध्ये 2016 च्या युरो कप विजेतेपदाचा समावेश आहे. फ्रान्समध्ये झालेल्या युरो कपच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रान्सला 1-0 ने पराभूत करत पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.
दुखापतीमुळे रोनाल्डोला अंतिम सामना पूर्ण खेळता आला नव्हता. मात्र, कर्णधार म्हणून त्याचे योगदान महत्त्वाचे ठरले. याशिवाय पोर्तुगालने 2019 आणि 2025 मध्ये UEFA नेशन्स लीगचे विजेतेपदही पटकावले.


दिवाळीआधी दलाल स्ट्रीटवर पैशांचा पाऊस! शेअर बाजारातील तेजीचे चार प्रमुख कारणे

नंबर-7 जर्सी आता पुढच्या पिढीकडे सोपवणार
रोनाल्डोने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात पोर्तुगालच्या नंबर-7 जर्सीचा उल्लेख करत आता ती परत करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. त्याच्या मते, 23 वर्षे ही जर्सी परिधान करणे ही त्याच्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची बाब होती.
ही जर्सी त्याने कधीही केवळ स्वतःची मानली नाही. ती पोर्तुगाल आणि तेथील नागरिकांची ओळख आहे, असेही त्याने स्पष्ट केले आहे. इतक्या प्रदीर्घ काळ देशाचे प्रतिनिधित्व करणे हा त्याच्यासाठी विशेष सन्मान होता. आता ही जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली असल्याचे त्याने म्हटले.

कोच जॉर्ज जीसस यांच्यासोबतच्या वादानंतर वाढला होता तणाव
रोनाल्डोची निवृत्ती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अलीकडच्या काळात पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जीसस यांच्यासोबतचे त्याचे मतभेद चर्चेत होते. नॉर्वेविरुद्धच्या नेशन्स लीग सामन्यादरम्यान या वादाला सुरुवात झाली होती. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यात पोर्तुगालने 2-1 ने विजय मिळवला. मात्र, रोनाल्डो संपूर्ण सामना बेंचवरच बसून राहिला. सामना संपल्यानंतर रोनाल्डो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. संघासोबत मैदानावर थांबून प्रेक्षकांचे अभिवादन करण्यासाठी तो आला नाही. यानंतर त्याने पोर्तुगालचा ट्रेनिंग कॅम्प सोडला. या घडामोडींमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबतच्या चर्चांना आणखी वेग आला होता.


क्लब फुटबॉलमध्ये रोनाल्डोचा प्रवास सुरूच राहणार

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली असली तरी रोनाल्डो फुटबॉल खेळणे थांबवणार नाही. तो सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणे सुरू ठेवणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठे लक्ष्य म्हणजे 1000 गोलांचा ऐतिहासिक टप्पा गाठणे.
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या काळाला फुटबॉल इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या युगांपैकी एक मानले जाते. पोर्तुगालसाठी 146 गोल, 234 सामने आणि अनेक ऐतिहासिक कामगिरीसह रोनाल्डो आता राष्ट्रीय संघाला निरोप देण्याच्या तयारीत आहे. त्याच्या या निर्णयामुळे जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी एका सुवर्णयुगाची सांगता होणार आहे.

Exit mobile version