Cristiano Ronaldo : रोनाल्डोचे स्वप्न अधुरेच, फिफा विश्वचषक 2026 मध्ये पोर्तुगालचा प्रवास थांबला
Cristiano Ronaldo : फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने सर्वांना धक्का देत पोर्तुगालविरुद्ध बाजी मारली आहे. या सामन्यानंतर स्पेनने या
Cristiano Ronaldo : फिफा विश्वचषक 2026 मध्ये स्पेनने सर्वांना धक्का देत पोर्तुगालविरुद्ध बाजी मारली आहे. या सामन्यानंतर स्पेनने या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर दुसरीकडे पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्टियाने रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे. आपला शेवटचा विश्वचषक खेळणारा रोनाल्डचे पुन्हा एकदा स्वप्न अधुरेच राहिल्याने तो मैदानात भावूक झाला होता. आपल्या शेवटच्या विश्वचषकात त्याला पोर्तुगालला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात यश न आल्याने तो भावूक झाला होता.
पोर्तुगाल विश्वचषकातून बाहेर
राउंड ऑफ 16 मधील पोर्तुगाल आणि स्पेन (Portugal vs Spain) यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यातील 91 व्या मिनिटाला स्पेनच्या मिकेल मेरिनोने गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या विजयासह स्पेनने उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. तर दुसरीकडे आतापर्यंत रोनाल्डोने सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला आहे. 41 वर्षीय रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) जाहीर केले होते की तो आपला शेवटचा फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2026) खेळत आहे. आपल्या संघाला आणखी पुढे नेण्याची त्याची इच्छा होती, परंतु स्पेनविरुद्धच्या पराभवामुळे पोर्तुगाल आणि रोनाल्डो या दोघांच्याही विश्वचषक मोहिमेचा शेवट झाला.
o Cristiano Ronaldo chorando pela eliminação de Portugal contra Espanha.
acho que nunca vi esse homem chorar na vida #PORxESP pic.twitter.com/qaXIlDX93n
— ☙ (@layzhis) July 6, 2026
सामन्यानंतर अश्रू
पोर्तुगालच्या पराभवानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डो भावूक झालेला दिसला. आपल्या संघाला विश्वविजेते बनवण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले, तरीही त्याला यश आले नाही. सामन्यानंतर रोनाल्डोने पुष्टी केली की तो पुन्हा फिफा विश्वचषक खेळणार नाही, परंतु आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याला थोडा वेळ हवा असल्याचे त्याने सांगितले.