Cristiano Ronaldo : इराणमध्ये महिलेला किस करणं रोनाल्डोला पडलं महागात; होणार 99 फटक्यांची शिक्षा?

Cristiano Ronaldo : इराणमध्ये महिलेला किस करणं रोनाल्डोला पडलं महागात; होणार 99 फटक्यांची शिक्षा?

Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला इराण सरकारकडून शिक्षा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही शिक्षा म्हणजे रोनाल्डोला 99 फटके देण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे नुकतचं रोनाल्डो अल नस्र फुटबॉल क्लबकडून सामना खेळण्यासाठी इराणला गेला होता. त्यावेळी त्याच्याकडून एक चूक झाली. मात्र ही चूक त्याला चांगलीच महागात पडणार आहे.

Ekda Yeun Tar Bagha: ‘एकदा येऊन तर बघा’चा धमाकेदार टिझर प्रदर्शित! ‘या’ दिवशी होणार रिलीज

… म्हणून होणार रोनाल्डोला शिक्षा

नुकतचं रोनाल्डो अल नस्र फुटबॉल क्लब कडून सामना खेळण्यासाठी इराणला गेला होता. हा सामना अशियायी चॅंम्पियन्स लीगचा होता. जो पर्सेपोलिस विरूद्ध खेळला गेला. त्यावेळी त्याच्या चाहत्यांना त्याला विविध भेटवस्तू दिल्या. त्यात एका महिला पेंटरने त्याला फारसी काळातील फुटबॉलची पेंटींग दिली. फातिमा हमीमी असं या महिला पेंटरचं नाव होतं. ती व्यंग असल्याने तिने तिच्या पायांच्या सहाय्याने हे पेंटींग बनवलं होतं.

World Cup 2023 : नेदरलँड्सच्या विजयात ‘चिठ्ठी’चा टर्निंग पॉइंट; काय आहे खास किस्सा?

तर तिने हे पेंटींग रोनाल्डोला भेट दिल्यानंतर त्याने तिचे आभार मानले. त्यासाठी त्याने हमीमीला मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केलं. मात्र त्याची ही कृती इराणच्या कायद्यांनुसार मोठी चूक आहे. कारण तेथील कायद्यांनुसार आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या महिलेसोबत असं वर्तन करणे गुन्हा आहे. त्यामुळेच आता रोनाल्डोला शिक्षा होणार असल्याचे बोलले जात आहे.

इराण सरकारने फेटाळले आरोप…

रोनाल्डोच्या या कृतीवर त्याला 99 फटक्यांची शिक्षा देण्यात येणार असल्याचे इराणच्या वृत्तपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर इराण सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले की, रोनाल्डोला शिक्षा होणार असल्याचं आम्ही फेटाळतो. अशा खोट्या बातम्यांमुळे गैरसमज पसरू शकतो. इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धादरम्यान त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. तर रोनाल्डोच्या हमीमी यांचे आभार मानन्याच्या कृतीवर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. तर इराणी अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुकच केले आहे. असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube