World Cup 2023 : नेदरलँड्सच्या विजयात ‘चिठ्ठी’चा टर्निंग पॉइंट; काय आहे खास किस्सा?

World Cup 2023 : नेदरलँड्सच्या विजयात ‘चिठ्ठी’चा टर्निंग पॉइंट; काय आहे खास किस्सा?

World Cup 2023 : वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्स संघाने मोठा उलटफेर (World Cup 2023) करत बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला पराभवाची धूळ चारली. नवख्या संघाने जोरदार दणका दिल्याने त्यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेदरलँड्सने आफ्रिकेचा पराभव कसा केला, विजयाचा टर्निंग पॉइंट काय होता असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर एका चिठ्ठीचाही किस्सा खास चर्चेत आहेत. सोशल मीडियावरही सामन्यातील त्या खास प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे.

काल नेदरलँड्सच्या (Netherlands) संघाने 38 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) विजय मिळवला. नेदरलँड्सचाही डाव गडगडला होता. एक वेळ अशी आली होती की 5 बाद 82 अशी अवस्था झाली होती. सामना हातचा जाणार असेच प्रत्येकाला वाटत होते. मात्र, कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या (78) झुंजार खेळीने संघाला सावरले आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 245 धावांचे टार्गेट देता आले. यानंतर संघाने गोलंदाजीत कमाल दाखवत आफ्रिकेचा पाडाव केला.

World Cup 2023 : पुन्हा मोठा उलटफेर; ऑरेंज आर्मीकडून बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा !

यानंतर या सामन्यातील एका चिठ्ठीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नेदरलँड्सच्या संघाने ज्यावेळी गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हापासून मैदानात चिठ्ठी येत होती. आफ्रिकेच्या संघाची पहिली विकेट पडण्याआधीही चिठ्ठी आली होती. ही चिठ्ठी आली आणि त्यानंतर विकेट पडल्याचे दिसून आले. त्यानंतर आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर मैदानात असतानाही अशीच चिठ्ठी आली होती. त्यानंतर पुन्हा विकेट पडली. या चिठ्ठीत होतं तरी काय ज्यामुळे नेदरलँड्सला यश मिळत गेलं अशी चर्चा सुरू झाली. त्याची उत्सुकता चाहत्यांना होती.

ज्यावेळी चिठ्ठी येत होती त्यावेळी नेदरलँड्सच्या संघाला यश मिळत होतं. य चिठ्ठीत काही टिप्स होत्या का ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्के आणि नेदरलँड्सला यश मिळत होते. हा काय प्रकार होता, असा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. याआधीही अशा गोष्टी क्रिकेटच्या मैदानात घडल्या आहेत.

https://twitter.com/_s_a_r_v_i_n/status/1714335277240762786?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1714335277240762786%7Ctwgr%5E412345ac445efd4007722c2145372d8fd646ee89%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-world-cup%2Fnews%2Fthe-turning-point-for-the-historic-win-for-the-netherlands-is-paper-ticket-lets-see-what-actually-happened-in-odi-world-cup-2023%2Farticleshow%2F104512737.cms

दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव

वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पुन्हा एकदा एक मोठा उलटफेर झाला आहे. लिंबू-टिंबू संघात गणल्या जाणाऱ्या नेदरलँड्सच्या (Netherlands) ऑरेंज आर्मीने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) मोठा पराभव केला आहे. या वर्ल्डकपमध्ये पहिला उलटफेर अफगाणिस्तानने गतविजेता इंग्लंडला पराभूत करून केला होता. आता नेदरलँड्सने तो कित्ता गिरवत दुसरा मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या संघाने केलेल्या मोठ्या कामगिरीमुळे मोठ्या संघांचे गुणतालिकेतील गणित बिघडले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube