आयपीएल 2026 चा हंगाम संपत आलाय आणि आता चर्चा सुरू झालीये ती 2027 च्या मेगा ऑक्शनची. यंदा पाच वेळचे चॅम्पियन्स चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. सलग पराभवांमुळे आता या दोन्ही फ्रँचायझी आपल्या संघात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत असे 10 खेळाडू, ज्यांना सीएसके आणि मुंबई इंडियन्स पुढच्या सीजनमध्ये डच्चू देऊ शकतात. यात एका कर्णधाराचा आणि 14 कोटींच्या खेळाडूचाही समावेश आहे!
कोण आहेत टीम इंडियाचे 4 नवे ‘मिस्ट्री’ खेळाडू? ज्यांच्या निवडीने सारेच थक्क!
चेन्नई सुपर किंग्स (CSK) – कोणते 5 खेळाडू होणार बाहेर? तर ऋतुराज गायकवाड़च्या नेतृत्वाखाली सीएसके सलग तीन वेळा प्लेऑफ गाठण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता संघात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
1. खलील अहमद : गेल्या काही सीजनपासून खलील मुख्य गोलंदाज होता, पण यंदा दुखापत आणि खराब फॉर्ममुळे त्याने 5 मॅचमध्ये फक्त 2 विकेट घेतल्या. दरम्यान फिटनेस आणि वाढते वय पाहता 2027 मध्ये त्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
2. डेवाल्ड ब्रेविस: ‘बेबी एबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेविसकडून खूप अपेक्षा होत्या, पण यंदा त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मेगा ऑक्शनच्या नियमांमुळे सीएसके त्याला रिलीज करू शकते.
3. प्रशांत वीर : 14 कोटींहून अधिकची मोठी बोली लावून सीएसकेने या खेळाडूला संघात घेतले खरे, पण प्रशांत दबावाखाली पूर्णपणे फ्लॉप ठरला. भारी किमतीला साजेसा खेळ न केल्याने त्याची सुट्टी निश्चित मानली जातेय.
4. शिवम दुबे : जो एकेकाळी टीमचा तारणहार होता, तोच दुबे यंदा संथ स्ट्राईक रेटमुळे टीकेचा धनी ठरला. फॉर्म पाहता सीएसके हा कठीण निर्णय घेऊ शकते.
5. मुकेश चौधरी : पहिल्या सीजनचा हिरो आता झिरो ठरतोय. मुकेशने यंदा खूप धावा लुटवल्या, त्यामुळे त्यालाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Hardik Pandya : BCCI देणार हार्दिक पांड्याला मोठा धक्का; 2027 च्या विश्वचषकातून वगळणार ?
मुंबई इंडियन्स (MI) – कोणत्या बड्या नावांना देणार धप्पा, तर 5 वेळचा चॅम्पियन मुंबईचा संघ गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर फेकला गेलाय. गेल्या 6 वर्षांपासून ट्रॉफी न मिळाल्याने मॅनेजमेंट मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.
1. हार्दिक पंड्या (कर्णधार) : सर्वात धक्कादायक नाव! ज्या विश्वासाने कप्तानी दिली, हार्दिक तिथेच फेल ठरला. ना बॅट चालली, ना बॉल. त्याच्या कप्तानीवरही प्रश्नचिन्ह असल्याने मुंबई त्याला रिलीज करू शकते.
2. सूर्यकुमार यादव : ‘मिस्टर 360’ ची बॅट यंदा शांत आहे. करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या सूर्याला रिलीज करून मुंबई आता तरुण रक्ताला संधी देण्याचा विचार करु शकते.
3. दीपक चाहर : 9.25 कोटींची किंमतीच्या दीपक चाहरने 7 मॅचमध्ये फक्त 6 विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 10च्या वर होता, जो मुंबईला परवडणारा नाही. अखेरच्या काही सामन्यांत त्याने विकेट घेतल्या पण त्याला धावांवर अंकुश ठेवता आला नाही.
4. शेरफेन रदरफोर्ड : फिनिशर म्हणून आलेल्या या कॅरेबियन खेळाडूने चाहत्यांची निराशा केली. एकही मॅच विनिंग खेळी न केल्याने त्याचा पत्ता कट होणार हे स्पष्ट आहे.
5. रॉबिन मिंज : 65 लाखात घेतलेल्या या युवा यष्टीरक्षकाला मिळालेल्या संधींचे तो सोने करू शकला नाही, त्यामुळे त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हार्दिक पंड्याला मुंबईने खरंच रिलीज केलं पाहिजे का? आणि सीएसकेने प्रशांत वीरला आणखी एक संधी द्यायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा.
