IPL 2023 Final: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023 चा अंतिम सामना गुजरातमध्ये होणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. पावसाची संततधार सुरू राहिल्यास सामन्याबाबत अनेक प्रकारचे नियम करण्यात आले आहेत. आजच्या सामन्यातील किमान 5 षटके पूर्ण होऊ शकली नाहीत, तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. चेन्नई आणि गुजरात संघ सज्ज आहेत. पण पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो.
अहमदाबादमध्ये पावसामुळे टॉसला उशीर होणार आहे. चाहते फायनल मॅचची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलने अंतिम सामन्याबाबत अनेक प्रकारचे नियम केले आहेत. जर पाऊस थांबला तर खेळ 9.40 पर्यंत सुरू करता येईल आणि षटके कमी केली जाणार नाहीत. मात्र यानंतर षटके कापली जातील. पावसामुळे आज किमान 5 षटके खेळली गेली नाहीत, तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आज हा सामना झाला नाही तर हा सामना सोमवारी होणार आहे.
चेन्नईचे फायनलसाठी ‘घातक’ अस्त्र तयार, प्रत्येक मोठ्या सामन्यात दाखवतोय ताकद
विशेष म्हणजे क्वालिफायर 2 दरम्यानही पाऊस पडला. पण षटके कापली गेली नाहीत. तो सामना अर्धा तास उशिराने सुरू झाला. क्वालिफायर 2 गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला, जो गुजरातने जिंकला. या विजयासह गुजरातने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. शुभमन गिलने संघाकडून चमकदार कामगिरी करताना शतक झळकावले होते. गुजरातच्या विजयात मोहित शर्माचाही महत्त्वाचा वाटा होता. त्याने 5 विकेट घेतल्या. आता पुन्हा एकदा संघाला या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.