CSK vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 20 षटकात 6 गडी गमावून 144 धावा केल्या. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नईकडून शिवम दुबेने 48 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. कोलकाताकडून गोलंदाजीत सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीने 2-2 बळी घेतले.
चेन्नईची सुरुवात चांगली झाली, पहिल्या 6 षटकात 52 धावा केल्या
नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात करण्यासाठी डेव्हॉन कॉनवे रुतुराज गायकवाडसह मैदानात उतरला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी झाली. चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का रुतुराज गायकवाडच्या रूपाने बसला, जो 13 चेंडूत 17 धावांची खेळी केल्यानंतर वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला.
सीएसकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेने कॉनवेसह धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या पहिल्या 6 षटकात 1 गडी गमावून 52 धावांपर्यंत नेली.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फोटोंचा परवानगीशिवाय गैरवापर, अज्ञातांविरुध्द FIR दाखल
चेन्नईने चांगली सुरुवात केल्यानंतर झटपट विकेट गमावल्या
सुरुवातीची 6 षटके संपल्यानंतर या सामन्यात सीएसकेचा डाव मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत होता. दरम्यान, 61 धावांवर संघाला दुसरा धक्का अजिंक्य रहाणेच्या रूपाने बसला, जो 11 चेंडूत 16 धावांची खेळी केल्यानंतर वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. 66 धावांवर, 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या डेव्हॉन कॉनवेच्या रूपात सीएसकेने तिसरी विकेट गमावली. 72 धावांपर्यंत चेन्नईचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीने चेन्नईला संभाळत लढतीच्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले
चेन्नई सुपर किंग्जचा अर्धा संघ 72 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सांभाळला. या दोघांनी मिळून 15 षटक संपल्यानंतर धावसंख्या 92 धावांपर्यंत नेली. 17 षटकांच्या अखेरीस दुबे आणि जडेजाने मिळून चेन्नईची धावसंख्या 115 धावांपर्यंत पोहोचवली. CSK ने 20 षटक संपल्यानंतर 6 गडी गमावून 144 धावा केल्या.
शिवम दुबेने 48 तर रवींद्र जडेजाने 20 धावा केल्या. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 68 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी पाहायला मिळाली. केकेआरकडून गोलंदाजीत सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी 2 -2 तर शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी 1 -1 बळी घेतला.