Download App

दिनेश कार्तिकची वाढदिवसाच्या दिवशीच मोठी घोषणा; सर्व फॉरमॅटमधून जाहीर केली निवृत्ती

1 जून हा दिनेश कार्तिकचा 39 वा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याने निवृत्तीची घोषणाही केली.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : टीम इंडियाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने आज (दि.1) त्याच्या वाढदिवशी निवृत्तीची घोषणा केली आहे. कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला आहे. अलीकडेच त्याने आयपीएल 2024 मध्ये एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा पराभव झाल्यानंतर त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली होती. दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2004 मध्ये सुरू झाली आणि जवळपास 20 वर्षानंतर त्याने आता क्रिकेटला अलविदा केले आहे. सोशल मीडिया एक्सवर एक मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट करून कार्तिकने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिकने सर्व चाहत्यांचे आभार मानत  त्याच्या बालपणापासून ते त्याच्या करिअरच्या शेवटपर्यंतच्या चित्रांचा व्हिडिओमध्ये समावेश केला आहे. (Dinesh Karthik officially announced his retirement on his 39th birthday)

कशी राहिली दिनेश कार्तिकची कारकीर्द?

दिनेश कार्तिकचा जन्म चेन्नईत झाला. त्याने वयाच्या 10 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो कुवेतमध्ये दोन वर्षे राहिला जेथे त्याचे वडील काम करत होते. सुरूवातीचे काही शिक्षण कुवेतमध्ये घेतल्यानंतर कार्तिक चेन्नईला शिफ्ट झाला. कार्तिकने 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2004 मध्ये तो टीम इंडियामध्ये सहभागी होत संघाचा सभासद झाला.

अजब योगायोग! 2007 च्या विनिंग टीम इंडियातील दहा खेळाडू निवृत्त पण, मैदानाबाहेर…

दिनेश कार्तिकने आपल्या कारकिर्दीत एकूण 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. याशिवाय त्याने 167 प्रथम श्रेणी सामने, 260 ए लिस्ट आणि 401 टी-20 सामने खेळले. कसोटीत कार्तिकने 1025 धावा केल्या. तर, एकदिवसीय सामन्यात त्याने फंलदाजी करत 1752 धावा केल्या. T20 मध्ये त्याने 686 धावा केल्या होत्या.

टीम इंडियातील 10 खेळाडूंनी गाठली तिशी; अनुभवी शिलेदार जिंकणार का वर्ल्डकप?

प्रथम श्रेणी कारकिर्दीत कार्तिकने 28 शतके आणि लिस्ट A मध्ये 12 शतके झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कार्तिकला केवळ एकच शतक करता आले. कार्तिकने 95 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आयपीएलमध्ये कार्तिकने 257 सामने खेळले आहेत. कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला होता.

follow us