ENG vs IND : भारताचा लाजिरवाणा पराभव ; इंग्लंडने 12 वर्षांनंतर टीम इंडियाविरुद्ध जिंकली T20 मालिका 

ENG vs IND :  भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत भारताच 9 विकेटने पराभव केला आहे.

ENG Vs IND 

ENG Vs IND 

ENG vs IND :  भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत भारताच 9 विकेटने पराभव केला आहे. या विजयानंतर भारताने पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत आता 3-0 अशी आघाडी घेतली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर इंग्लंडने भारताविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे.

चौथ्या टी20 सामन्यात (ENG vs IND) भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) तुफानी फलंदाजी करत संघाला 20 षटकांत 158 धावांपर्यंत पोहोचवले. श्रेयस अय्यरला इतर कोणत्याही फलंदाजाने साथ दिली नाही. संघाला 20 षटकांत 158 धावांपर्यंत इंग्लंडने अवघ्या 13.5 षटकांत 159 धावा करत सामना आणि मालिका दोन्ही जिंकले.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक व्यर्थ

श्रेयस अय्यर व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला या सामन्यात विशेष प्रभाव पाडता आला नाही. त्याने 49 चेंडूंत 80 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 4 चौकार आणि 5  षटकारांचा समावेश होता. या मालिकेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक होते. वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) पुन्हा एकदा निराशा केली तो 10 चेंडूंत 15 धावा करून बाद झाला.

सिंह राशीसह ‘या’ पाच राशींना आज मिळणार नशिबाची साथ

ब्रूक आणि सॉल्टची दमदार फलंदाजी 

फलंदाजीनंतर गोलंदाजीची वेळ आली. इंग्लंडच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज हतबल दिसले. सलामीवीर फिल सॉल्टने 42 चेंडूंत 59 धावांची आक्रमक खेळी केली, तर कर्णधार हॅरी ब्रूकने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 35 चेंडूंत 79 धावा कुटल्या. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 225  इतका होता. भारतीय गोलंदाजांना केवळ जोस बटलरला (8 धावा) बाद करण्यात यश आले. 12 वर्षांनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची टी 20 मालिका हरली आहे.

Exit mobile version