संजू सॅमसन आऊट अन् ‘या’ स्टार खेळाडूला संधी; दुसऱ्या टी20 साठी जाणून घ्या भारताची प्लेइंग 11

Vaibhav Suryavanshi : आयर्लंड आणि भारतात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात सर्वांना धक्का देत आयर्लंडने बाजी मारली आहे. दोन सामन्यांच्या

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi : आयर्लंड आणि भारतात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात सर्वांना धक्का देत आयर्लंडने बाजी मारली आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने आता 28 जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टी20 सामन्यातून संजू सॅमसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. तर सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी ?

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयर्लंडविरुद्ध (Ireland) पहिल्या सामन्यात भारतासाठी पदार्पण करणार असं सर्वांना वाटत होते मात्र त्याला संधी मिळाली नाही. तर आता दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात संजूने अभिषेकसोबत फलंदाजीची सुरुवात केली होती तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) त्यानंतर  तिलक वर्मा आणि शिवम दुबे फलंदाजीसाठी आले होते मात्र पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजींती कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली.

भारतासाठी अभिषेक शर्माने 19 चेंडूत अर्धशतक झळकावला आणि भारताला शानदार सुरुवात करुन दिली मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. तर दुसरीकडे  प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या सामन्यातून बाहेर होऊ शकते. त्याने पहिल्या सामन्यात चार ओव्हरमध्ये 57 धावा दिल्या. तर त्याच्या गेल्या दोन सामन्यात त्याने 126 धावा दिल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्या जागी दुसऱ्या टी20 सामन्यात प्रिन्स यादवला संघात स्थान मिळू शकते.

भारतीय म्हणूनच अखेरचा श्वास घ्यायचा, 94 वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्व सोडत केली भारतीय नागरिकत्वाची मागणी

जर दुसऱ्या टी20 सामन्यासाठी वैभवला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय क्रिेकटमध्ये भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. सचिनने वयाच्या 16 वर्षे 205 व्या दिवशी भारतासाठी आपला पहिला सामना खेळला होता, तर वैभव सध्या अवघ्या 15 वर्षांचा आहे.

follow us