Shreyas Iyer : श्रेयस अय्यर कर्णधार होताच BCCI चा मोठा निर्णय; चार खेळाडू बाहेर
Shreyas Iyer : बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यांसाठी भारतीय टी20 संघात बीसीसीआयने
Shreyas Iyer : बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यांसाठी भारतीय टी20 संघात बीसीसीआयने मोठे बदल केले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय टी20 संघाचा कर्णधार बदला असून सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मार्च 2026 मध्ये भारताने सूर्यकुमार यादवाच्या नेतृत्वाखाली शेवटचा टी20 सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
या सामन्यात भारताने (Team India) बाजी मारली होती. मात्र आता भारतीय संघात सूर्याकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्थान देण्यात आले नाही. त्याच्या जागी संघात दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर बीसीआयने टी20 विश्वचषक 2026 च्या संघातील 4 खेळाडूंना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सूर्यकुमार यादवची जागा घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीचा समावेश करण्यात आला आहे, तर कुलदीप यादवच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसणार नाही मात्र तो आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या जागी हर्षित राणाची निवड करण्यात आली आहे. रिंकू सिंगलाही टी20 संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. युवा गोलंदाज प्रिन्स यादवचाही पहिल्यांदाच टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. केवळ 15 वर्षे आणि 71 दिवस वय असलेला वैभव सूर्यवंशी राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळापासून असलेला विक्रम मोडला आहे.
भारतीय संघ 26 आणि 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. त्यानंतर, 1 जुलै ते 11 जुलै या कालावधीत ते इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यरने 3 डिसेंबर 2023 रोजी बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, प्रिन्स यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि वैभव सूर्यवंशी.
सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना; वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरू
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.