भारतीय म्हणूनच अखेरचा श्वास घ्यायचा, 94 वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्व सोडत केली भारतीय नागरिकत्वाची मागणी

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा यांनी भारतीय नागरिकत्व पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज केला.

  • Written By: Published:
Untitled Design 56

Demand for Indian citizenship : परदेशात, विशेषतः अमेरिका किंवा कॅनडासारख्या देशांमध्ये स्थायिक होणे अनेक भारतीयांसाठी प्रतिष्ठेचे आणि सामाजिक दर्जा उंचावणारे मानले जाते. मात्र आंध्र प्रदेशातील 94 वर्षीय एका महिलेने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे की, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहिले तरी भारतीय असण्याची ओळख सर्वात महत्वाची असते. आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चिंथगुंपला गावच्या रहिवाशी असलेल्या कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा यांनी भारतीय नागरिकत्व पुन्हा मिळवण्यासाठी अर्ज केला असून, भारतीय म्हणूनच माझा शेवटचा श्वास व्हावा, अशी भावनिक इच्छा त्यांनी व्हॅक्त केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी बापटला जिल्हाधिकारी व्ही. विनोद कुमार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील पीजीआरएस सभागृहात पार पडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती नागभूषणम यांच्या निधनानंतर महालक्ष्मम्मा यांनी जुलै 2000 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. मात्र जवळपास दोन दशके अमेरिकेत राहिल्यानंतर त्या 2018 मध्ये भारतात परतल्या आणि आपल्या मूळ गावी स्थायिक झाल्या. भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वेच्छेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय नागरिकत्व पुनर्स्थापित करण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला.

महसूल खात्यातील ‘स्टॅम्प ड्युटी स्कॅम’चा पर्दाफाश, 20 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या संशयाने खळबळ

नागरिकत्व प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी तेलगू भाषेत संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करणारी शपथ घेतली. एका अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास आणि निष्ठा ठेवण्याची तसेच नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याची प्रतिज्ञा केली. जिल्हाधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले की, शपथविधिनानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि कायदेशीर प्रक्रियेतील सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शपथविधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची घोषणा केली.

सध्या महालक्ष्मम्मा यांच्याकडे ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड तसेच अमेरिकन नागरिकत्व आहे. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी पुन्हा भारतीय नागरिक होण्याची तीव्र उच्च व्यक्त केली आहे. माझे उर्वरित आयुष्य भारतातच घालवायचे आहे आणि माझ्यावरचे अंतिम संस्कार देखील मातृभूमीतच व्हावेत, अशी भावना त्यांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.

17 वर्षे अपराजित राहिलेल्या भारताचा आयर्लंडने अखेर पराभव केला; बेलफास्टमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद

त्यांच्या वयोमानाचा विचार करून शपथेची प्रत तेलगू भाषेत उपलब्ध करून देण्यात आली होतो. त्यांचा मुलगा त्यांना शपथ वाचून दाखवत होता. महालक्ष्मम्मा यांनी सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली. त्यांचा अर्ज आणि संबंधित अहवाल आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. नागरिकत्वासंदर्भातील अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेबाबत बोलताना जिल्हाधिकारी विनोद कुमार म्हणाले, हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि हृदरस्पर्शी क्षण होता.

follow us