आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी भारतीय संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीची धमाकेदार एन्ट्री

Indian Squad For England Tour :  बीसीसीआयकडून आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Indian Squad For England Tour

Indian Squad For England Tour :  बीसीसीआयकडून आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात वैभव सूर्यवंशीची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघांची निवड केली. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरची भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर तिलक वर्माची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.

अय्यरने यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर आयपीएल 2026 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तिलक वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 26 जूनपासून आयर्लंडमध्ये दोन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर 1 जुलैपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. सप्टेंबरमध्ये जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

 इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, प्रिन्स यादव, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि वैभव सूर्यवंशी.

follow us